नवी दिल्ली - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र या निकालांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळणे पसंत केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून, त्या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी संसदेतील कामकाजाबाबत आपले मत मांडले. मात्र पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या होत असलेल्या पिछेहाटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट हा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या तिन्ही राज्यांमधील विजयामुळे काँग्रेसची ताकद वाढली असून, 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आव्हान अधिकच कठीण झाले आहे.
Assembly Election 2018 Results : निवडणुकीच्या निकालांबाबत मोदींचे मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:56 AM
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र या निकालांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळणे पसंत केले.
ठळक मुद्देपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे.या निकालांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळणे पसंत केलेमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट हा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.