भोपाळ - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकालांच्या कलांमध्ये केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला जबदरस्त धक्का बसला आहे. भाजपाच्या ताब्यात असलेली मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही तिन्ही राज्ये काँग्रेसने खेचून घेतली आहे. या पराभवानंतर भाजपाच्या नेत्यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली असून, हा नरेंद्र मोदींचा पराभव नसल्याचा दावा मध्य प्रदेशमधील भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाला बसलेल्या धक्क्याबाबत प्रतिक्रिया देताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले, विधानसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट हा मोदींचा पराभव नाही. राज्यात तिकीट वाटप करताना आमच्याकडून काही चुका झाल्या. तसे काँग्रेसच्या आव्हानाकडे आम्ही तितक्याशा गांभीर्याने पाहिले नाही. त्याची परिणती या निकालांमध्ये झाली."
Assembly Election 2018 Results : हा नरेंद्र मोदींचा पराभव नाही, भाजपा नेत्यांकडून सारवासारव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:31 AM
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकालांच्या कलांमध्ये केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला जबदरस्त धक्का बसला आहे.
ठळक मुद्दे पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकालांच्या कलांमध्ये केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला जबदरस्त धक्का बसला आहे. या पराभवानंतर भाजपाच्या नेत्यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली असून, हा नरेंद्र मोदींचा पराभव नसल्याचा दावा मध्य प्रदेशमधील भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहेभाजपाच्या ताब्यात असलेली मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही तिन्ही राज्ये काँग्रेसने खेचून घेतली आहे