गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 10:39 AM2021-03-12T10:39:19+5:302021-03-12T10:41:05+5:30

विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे.

assembly election 2021 adr report says 170 mla of congress left the party in last four years | गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा

गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा

Next
ठळक मुद्देADR च्या अहवालात महत्त्वाची माहिती समोरगेल्या ४ वर्षांत काँग्रेसच्या १७० आमदारांचा पक्षाला रामरामकाही राज्यांमध्ये दलबदलूंमुळे सत्तातर

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि अन्य पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. अशातच कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे. यामुळे कोणत्या पक्षाचा फायदा आणि कोणाचे अधिक नुकसान झाले, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (assembly election 2021 adr report says 170 mla of congress left the party in last four years) 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या संस्थेकडून यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे चित्र संपूर्ण देशाने पाहिले. गेल्या चार वर्षांत विविध राज्यांमधील निवडणुकीवेळी काँग्रेसच्या शेकडो आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे या ADR रिपोर्टमधून समोर आले आहे. 

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

काँग्रेसला मोठी गळती

सन २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या काळात विविध राज्यांमधील तब्बल १७० आमदारांनी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. तर भाजपच्या केवळ १८ आमदारांनी पक्ष सोडल्याची माहिती समोर आली आहे. याच कालावधीत आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या ४०५ आमदारांपैकी १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, २८ आमदार काँग्रेसमध्ये गेले तर २५ आमदार तेलंगण राष्ट्र समितीत गेले, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

दलबदलमुळे सत्तांतर

विशेष म्हणजे गोवा, मध्य प्रदेश, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आमदारांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यामुळे  तेथील सरकार बदलले. यापैकी गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील सत्ता बदलाची चर्चा देशभर सुरू होती. या रिपोर्टनुसार, सदर कालावधीत पक्ष बदलून राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या १६ खासदारांपैकी १० खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आला आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या केवळ पाच खासदारांनी फारकत घेत अन्य पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या सात राज्यसभा सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, अशी माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नेते, मंत्री, आमदार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Web Title: assembly election 2021 adr report says 170 mla of congress left the party in last four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.