तामिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कडगम (DMK) च्या मोठ्या विजयानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. रामानाथापूरम जिल्ह्यातील डीएमके समर्थक असलेल्या एका महिलेने सोमवारी सकाळी एका मंदिराबाहेर आपली जीभ कापली. या महिलेने एका मंदिरात तामिळनाडूनत 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेचे सरकार आल्यास आपण आपल्या जिभेचा बळी देऊ, असा नवस केला होता. (Assembly Election 2021 Tamil Nadu woman cut off her tongue outside the temple after dmk victory)
या 32 वर्षीय महिलेचे नाव वनिथा असल्याचे समजते. परमाकुडी येथे राहणाऱ्या वनिथाच्या पतीचे नाव कार्तिक असे आहे. डीएमकेला राज्यात बहुमत मिळाल्यानंतर वनिथा या मुथाल्लन येथील मंदिरात पोहोचल्या. येथील मूर्ती समोर जीभ कापून नवस पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतही सध्या अनेक निर्बंध लागू आहेत. मंदिरे तथा इतर धार्मिक स्थळांत जाण्यावर बंदी आहे. यामुळे मंदिराचे गेट बंद असल्याने वनिथा यांनी मंदिराबाहेरच आपली जीभ कापली. मंदिराच्या गेटवरच जीभ ठेवल्यानंतर वनिथा या मोठ्या प्रमाणावर ब्लिडिंग झाल्याने बेशुद्ध झाल्या.
यानंतर काही लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तामिळनाडूतील अनेक लोक राजकीय नेत्यांवर प्रचंड प्रेम करतात. येथे विजयानंतर मुंडन करणे ही तर सामान्य गोष्ट आहे.
डीएमके आणि एआयडीएमके, तामिळनाडूतील या दोन्ही मुख्य राजकीय पक्षांत मुख्य नेत्यांवर प्रमाणाबाहेर प्रेम करणारे समर्थक आहेत. 5 डिसेंबर 2016 रोजी एआयडीएमकेच्या प्रमुख जयललिता यांचे निधन झाले होते. यावेळी, जवळपास 30 जणांचा जयललिता यांच्या निधनाचे वृत्त ऐकूण धक्का बसिल्याने मृत्यू झाल्याचा रिपोर्टदेखील समोर आला आहे.तामिळनाडूत नवीन समीकरण -गेल्या अनेक निवडणुकीत राज्याच्या राजकारणात दबदबा असणारे एम करुणानिधी आणि जयललिता यांच्या अनुपस्थितीत ही राज्यातील पहिलीच विधानसभा निवडणूक होती. अण्णा द्रमुक यांना जयललिता यांच्याऐवजी कोणताही पर्याय शोधता आला नाही. तर द्रमुकने करुणानिधी यांचे सुपूत्र एम के स्टॅलिन यांच्यावर भरवसा ठेवला. जर अण्णा द्रमुक सत्तेत कायम राहिली असती तर डीएमकेमध्ये फूट पडली असती. परंतु डीएमकेच्या यशामुळे स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्याशिवाय राज्यात तिसरी राजकीय शक्ती उभी राहण्याची संधी मिळाली आहे. जो प्रयत्न भाजपा गेल्या अनेक वर्षापासून करत होती.