UP Assembly Election 2022: नोएडाचे भाजपा आमदार आणि उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष पंकज सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं आहे. जेव्हा एअरस्ट्राईक केला जातो, सर्जिकल स्ट्राईक होतो आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा होतो तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना दु:खं होतं, असं पंकज सिंह म्हणाले.
भारत आणि चीन सीमेवरील वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा सुरू असताना राहुल गांधांनी भाजपा सरकारवर केलेल्या आरोपांना पंकज सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. "१९६२ सालापासून काँग्रेसचं सरकार जोवर देशात होतं त्यावेळची स्थिती राहुल गांधी कदाचित विसरलेले दिसतात. जेव्हा एअरस्ट्राइक केला गेला, सर्जिकल स्ट्राइक असो आणि पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले की काँग्रेस नेत्यांना त्याचं दु:खं होत असल्याचं दिसून येतं", असं पंकज सिंह म्हणाले.
महागाईच्या मुद्द्यावर बोलताना योगी सरकारनं उत्तर प्रदेशात केलेल्या कामांचा पाढाच सिंह यांनी वाचून दाखवला. सरकारनं कोरोना काळात तब्बल ८० कोटी नागरिकांना मोफत राशन देण्याचं काम केलं. यामुळे गरिबांना वेळेत जेवण मिळालं. तसंच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही केंद्र सरकारनं घट केली, असं पंकज सिंह म्हणाले.
जनतेला समाजवादीवर विश्वास उरलेला नाहीअखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना पंकज सिंह यांनी जनतेला आता समाजवादी पक्षावर विश्वास राहिलेला नाही, असं विधान केलं. समाजवादी पक्षानं आजवर केवळ मतांचं राजकारण केलं आहे. उत्तर प्रदेशचा विकास काही केला नाही, असं पंकज सिंह म्हणाले.