मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. या ठिकाणी सत्ता राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांना पणजीतून पक्षाने तिकीट न दिल्याने नाराजी असून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही निवडणुकीच्या धामधुमीत पक्षत्याग केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या छोट्याशा राज्यात मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उत्तराखंडात पुष्करराज कायम राहील?
तरुण तडफदार ‘कमळ’धारी मुख्यमंत्री पुष्करराज धामी यांच्या हातीच पुन्हा एकदा सत्तेची दोरी सोपवायची की ज्येष्ठ आणि अनुभवी हरीश रावत यांच्या ‘हाता’वर टाळी द्यावी, याचा निर्णय उत्तराखंडच्या मतदारांना घ्यावा लागणार आहे. आम आदमी पक्षानेही मतदारांसमोर पर्याय ठेवला आहे.
मतदारांचा व्हॅलेंटाइन’ कोण?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’लाच मतदान हा योग जुळून आला असून मतदारांच्या मनातील ‘व्हॅलेंटाइन’चे नशीब मतदान यंत्रात बंद होणार आहे. थेट १० मार्च रोजीच त्याचे उत्तर मिळणार आहे.