Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 05:29 PM2021-04-07T17:29:05+5:302021-04-07T17:29:42+5:30
Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असून राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
कोलकाता - भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते प्रचारसभा घेत आहेत. या दरम्यान, आज अमित शहांनी एका रिक्षावाल्या कार्यकर्त्याच्याघरी जेवण केलं. येथील दोमजूर मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ अमित शहांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.
पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असून राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांची निराशा, त्यांच्या वागण्यात, भाषणात आणि व्यवहरातही दिसून येत आहे. त्यामुळेच, भाजपाच विजय निश्चित आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते राजीव बॅनर्जी यांचा प्रचार करण्यासाठी मी आलो आहे, मला पूर्णपणे विश्वास आहे, की राजीव निवडूण येतील. 2 मे रोजी जेव्हा निकालाचे आकडे समोर येतील, तेव्हा 200 पेक्षा जास्त जागांवर भाजप विजयी ठरेल, असेही त्यांनी म्हटले.
Domjur: Union Home Minister and BJP leader Amit Shah has lunch at the residence of a rickshaw puller who is also a BJP supporter. Rajib Banerjee, party's candidate from the constituency also present. #WestBengalpic.twitter.com/het96CYWnz
— ANI (@ANI) April 7, 2021
दोमजूर येथील रोड शोपूर्वी अमित शहा यांनी एका रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले. यावेळी, राजीव बॅनर्जींसह अनेक पदाधिकारीही दुपारच्या जेवणाला उपस्थित होते.
अमित शहांच्या जीवाला धोका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) आणि उत्तर प्रदेशचे मुख्य़मंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या जिवाला धोका आहे. मुंबईतील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (CRPF) मुख्यायाला एक मेल मिळाला आहे. यामध्ये येणाऱ्या काही दिवसांत गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे.