कोरोना महासाथीदरम्यान, आज पाच विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (trinamool ongress) ममता बॅनर्जींनाच (Mamata banerjee) लक्ष्य केले होते. मात्र, त्याच्या उलटा खेळ झाला असून तृणमूल संपण्याऐवजी (left and congress) डावे आणि काँग्रेसच संपली आहे. कलांनुसार तृणमूलला २०२ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर भाजपाला ८७ जागांवर आघाडी दिसत आहे. मात्र, डाव्यांच्या पारड्यात भोपळा पडताना दिसत आहे. दरम्यान, या कलांवर कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं हे घाईचं होईल, असं मत पश्चिम बंगालचे भाजपचे प्रभाली कैलास विजयवर्गीययांनी म्हटलं. "संध्याकाळपर्यंत स्थिती स्पष्ट होईल. लॉकेट चटर्जी मागे राहतील याचा अंदाज आला होता. परंतु बाबुल सुप्रिया मागे राहतील याचा अंदाज नव्हता. चार पाच फेऱ्यांपर्यंत लॉकेट चटर्जी, स्वपन दास हे मागे राहतील याची कल्पपना होती," असं विजयवर्गीय म्हणाले. आजतकशी साधलेल्या विशेष संवादादरम्या त्यांनी यावर भाष्य केलं. "चार-पाच फेऱ्यांनंतर हे लोकं पुढे येतील. बाबुल सुप्रियोंबाबत जाणून घेतल्यानंतर आश्चर्य वाटतंय. त्यांचा पराभव आम्हाला हजम होत नाहीये," असंही ते म्हणाले. यावेळी ते सुवेंदु अधिकारी यांच्या विजयाबद्दल आश्वस्त दिसले. ममता बॅनर्जी यांचा जवलपास २५ हजार मतांनी पराभव होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या निवडणुकांत तृणमूलला २१० जागा२०१६ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला २१० जागा मिळाल्या होत्या. डाव्यांच्या आघाडीला ७७ आणि भाजपाला ३ जागा मिळाल्या होत्या. तसेच अन्यला ४ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने अब की बार २०० पार म्हणत पश्चिम बंगालमध्ये जोरदार ताकद लावली होती. पश्चिम बंगालसाठी भाजपाने केरळच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, भाजपाला ममता बॅनर्जींच्या तृणमूलला काही संपविणे जमलेले नाहीय. उलट भाजपाने डाव्यांना आणि काँग्रेस आघाडीला संपविले आहे. डाव्यांच्या पारड्यात ७७ वरून थेट शून्य पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Assembly Election Result 2021 : बंगालमध्ये भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले; मतदारांचा 'खेला' पाहून बडे नेतेही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 1:18 PM
कैलासवर्गीय म्हणाले, "बाबूल सुप्रियोंचा पराभव..."
ठळक मुद्देनिकालांबद्दल आता काही बोलणं चुकीचं ठरेल, विजयवर्गीय यांची प्रतिक्रियाकलांनुसार तृणमूल काँग्रेसला बहुमत