शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

राहुल गांधींनी पराभव स्वीकारला; म्हणाले-'विचारधारेची लढाई सुरुच राहणार...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 5:35 PM

Assembly Election Result 2023: काँग्रेसने तेलंगाणात सत्ता काबीज केली आहे, पण मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या पराभव झाला आहे.

5 State Assembly Election Result 2023: मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसची सत्ता आली. आजच्या निकालांवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

भाजपने मध्य प्रदेशात आपली सत्ता राखली तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोठा विजय मिळवला. या दोन राज्यांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर राहुल गांधी यांनी सर्वांचे आभार मानले. "मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. विचारधारेची लढाई सुरुच राहणार. मी तेलंगणातील जनतेचाही खूप आभारी आहे. प्रजालू तेलंगणा बनवण्याचे वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू," अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली.

मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "काँग्रेसवर विश्वास दाखवल्याबद्दल मी तेलंगणातील मतदारांचे आभार मानतो. ज्यांनी आम्हाला छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मतदान केले, त्या सर्वांचेही आभार मानतो. हे निवडणूक निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत, पण आम्हाला खात्री आहे की, आम्ही कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने परत येऊ. मी आमच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही आभार मानतो. या पराभवाने खचून न जाता 'INDIA' आघाडीतील पक्षांसोबत आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करू," अशी प्रतिक्रिया खर्गेंनी दिली.

संबंधित बातमी- 'तुम्हा सर्वांचे मनापासून आभार..!' भाजपच्या मोठ्या विजयानंतर PM नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३