शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

गुजरातमध्ये भाजपा अन् हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकण्यामागची ५ प्रमुख कारणे, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 8:59 AM

मोदीमॅजिक विक्रम : भाजपचा बालेकिल्ल्यात ‘न भूतो’ विजय, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ पैकी काँग्रेसने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे,

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याने गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपच्या यशाचे कमळ फुलले, तर हिमाचल प्रदेशात जनतेने भाजपविरोधी कौल दिला असून काँग्रेसच्या हाती सत्ता सोपविली आहे. गुजरातमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकून तेथील आजवरची सर्वांत विक्रमी कामगिरी केली. गेल्या निवडणुकीत भाजपला ९९ जागांवर रोखणाऱ्या काँग्रेसची दारूण स्थिती झाली. मोठा गाजावाजा करत मैदानात उतरलेला आप पक्ष राज्यात चंचूप्रवेश करू शकला. 

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ पैकी काँग्रेसने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे, तर भाजपला २५ जागांंवर यश मिळाले आहे. आप पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. राज्यात भाजपचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या कारभारावर जनता नाराज होती. त्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. 

जिंकण्याची ५ कारणे...

गुजरात - भाजप

मोदी ब्रँड  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड सभा घेतल्या. त्यांच्या ब्रँडनेमवर निवडणुकीचे चित्रच बदलले. वातावरण निर्मितीसाठी भाजप प्रचारकांचीही फौज होतीच.  व्यवस्थापन : निवडणूक व्यवस्थापन काँग्रेस आणि आपपेक्षा चांगले होते. तिकिटांचे गणित : नव्या चेहऱ्यांवर लक्ष दिले. दिग्गजांची तिकिटे कापली. त्याचा फायदा झाला. अस्मितेला हात : भाजपच्या नेत्यांनी सर्वच सभांमध्ये गुजराती अस्मितेवर भर दिला. ते मतदारांना भावले. नेटवर्क : रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे, भाजपचे ग्रामीण, शहरी भागापर्यंत पोहोचलेले कार्यकर्ते यांचा मोठा फायदा झाला.

हिमाचल - काँग्रेस 

नाराजी : भाजपचे मुख्यमंत्री ठाकूर यांच्या कारभारावर जनता होती नाखूश. ते काँग्रेसच्या पथ्यावर पडले. असंतोष : सरकारविरोधात लोकांमधील असंतोषाचा काँग्रेसला फायदा.परंपरा : प्रस्थापितां विरोधात मतदान करण्याची परंपरा कायम राहिली.भाजपचे अपयश : विकासाची दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात भाजप अयशस्वी.एकच पर्याच : म्हणून काँग्रेसला जनतेने पाच वर्षांनी पुन्हा दिली सत्ता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022