नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे जाहीर होत आहेत. पहिल्या अडीच तासांत निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता राखताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत. मात्र भाजपकडे सत्ता कायम राहील असं आकडेवारी सांगत आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ४०३ आमदार आहेत. सध्या ३७८ जागांचे कल हाती आले आहेत. पैकी २४६ मतदारसंघांत भाजप आघाडीवर आहेत. तर समाजवादी पक्ष १२० जागांवर पुढे आहे. उत्तर प्रदेशात गेल्या ३ दशकांत कोणत्याच पक्षाला सत्ता राखता आलेली नाही. मात्र भाजपनं इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
गोवा, मणिपूर, उत्तराखंडातही भाजपनं आघाडी घेतली आहे. सध्या या तिन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. आता हाती येत असलेले निकालाचे कल पाहता तिन्ही राज्यांत भाजप सत्तेत कायम राहिलं असं दिसत आहे. उत्तराखंड आणि गोव्यात भाजप-काँग्रेसमध्ये सुरुवातीला जोरदार लढत दिसत होती. मात्र आता दोन्ही राज्यांत भाजपनं मोठी आघाडी घेतली आहे.
सध्याचं चित्र काय?उत्तराखंड (एकूण जागा ७०)भाजप ४२ जागांवर आघाडीवरकाँग्रेस २२ जागांवर पुढे
मणिपूर (एकूण जागा ६०)काँग्रेस+ ९ जागांवर पुढेभाजप २५ जागांवर आघाडीवरअन्य २६ जागांवर पुढे
गोवा (एकूण जागा ४०)भाजप १९ जागांवर पुढेकाँग्रेस+ १२ जागांवर पुढेटीएमसी ५ जागांवर आघाडीवर