नवी दिल्ली : कोरोना काळात बिहार विधानसभा निवडणुकीसमवेत मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेशसहझारखंड, नागालँड, कर्नाटक, मणिपूर, व ओडिशामध्ये पोटनिवडणूक होत आहे. प्रत्येकी एका जागेसाठी छत्तीसगढ, तेलंगणा व हरयाणामध्येही ३ नोव्हेंबरलाच मतदान होईल.उत्तर प्रदेशमधील ७ विधानसभा मतदारसंघातील निकाल म्हणजे दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप नेत्यांना सातही मतदारसंघांत तळ ठोकण्याचे आदेश दिले.झारखंड विधानसभेच्या पोटनिवडणूक होत असलेल्या दुमका व बेरमो मतदारसंघांवर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे वर्चस्व आहे. दुमकासाठी तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वत:चे बंधू वसंत सोरेन यांनाच उमेदवारी दिली आहे. राज्यसभा खासदार शिबू सोरेन यांच्या झामुमोच्या दुसºया पिढीसाठी ही निवडणूक महत्त्वाची. सोरेन कुटुंबातील कलहाची चर्चा होत असताना वसंत यांना उमेदवारी मिळाल्याने पक्षांतर्गतही संदेश देण्यात हेमंत यशस्वी झाले. आठ वेळा शिबू सोरेन, तर तीन वेळा भाजपचा लोकसभा उमेदवार दुमकातून विजयी झाला. मागील वर्षी राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या आठ जागांवर गुजरातमध्ये मतदान होणार आहे. विश्वासघातकी नेते- हा परवलीचा शब्द काँग्रेस नेते वापरत आहेत, तर काँग्रेसमधील गटबाजीमुळे कंटाळून आमदारांनी राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण भाजपकडून दिले जात आहे.ज्योतिरादित्य यांच्या नेतृत्वाची कसोटीखासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याही नेतृत्वाची कसोटी असेल. पोटनिवडणूक होणाºया २८ पैकी १६ मतदारसंघ ग्वाल्हेर, चंबल भागातील आहेत.१६ पैकी ९ मतदारसंघांत कधीकाळी बसपचे उमेदवारही विजयी झाल्यामुळे सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने त्यासाठीही रणनीती आखली आहे.काँग्रेसने २४, भाजपने सर्व, तर बसपने १८ जागांवर उमेदवार जाहीर केले. मध्यप्रदेशातील सोळाही मतदासंघांत अनुसूचित जातीतील मतदारांची संख्या प्रभाव पाडण्याएवढी आहे.
बिहारच नव्हे, तर उत्तर प्रदेश, गुजरातही भाजपसाठी महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 2:23 AM