Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम... एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 06:14 PM2021-02-26T18:14:34+5:302021-02-26T18:15:40+5:30

assembly elections 2021: आसाम (Assam Assembly Elections), पदुच्चेरी (Puducherry Assembly Elections), तामिळनाडू (Tamil Nadu Assembly Elections), केरळ (Kerala Assembly Elections) आणि पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या तारखा जाणून घ्या...

assembly elections 2021 here are all dates and result day all you need to know about election | Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम... एका क्लिकवर

Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम... एका क्लिकवर

Next

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आसाम, पदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वियमांचं पालन करून आणि मतदारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अरोडा यांनी यावेळी दिली. पाचही राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. जाणून घेऊयात पाचही राज्यांच्या निवडणुकीबाबतच्या महत्वाच्या तारखा...

तामिळनाडू विधानसभा निवडणूक (Tamil Nadu Assembly Elections)

>> एकाच टप्प्यात निवडणूक होणार- ६ एप्रिल रोजी मतदान

आसाम विधानसभा निवडणूक (Assam Assembly Elections)

आसाममध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.

>> पहिला टप्पा - २७ मार्च मतदान

>> दुसरा टप्पा- १ एप्रिल मतदान

>> तिसरा टप्पा- ६ एप्रिल मतदान

पदुच्चेरी विधानसभा निवडणूक (Puducherry Assembly Elections)

>> एकाच टप्प्यात मतदान- ६ एप्रिल रोजी मतदान

केरळ विधानसभा निवडणूक (Kerala Assembly Elections)

>> एकाच टप्प्यात निवडणूक- ६ एप्रिल रोजी मतदान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Elections)

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक

>> पहिला टप्पा -  २७ मार्च मतदान
>> दुसरा टप्पा - १ एप्रिल मतदान
>> तिसरा टप्पा - ६ एप्रिल मतदान
>> चौथा टप्पा - १० एप्रिल मतदान
>> पाचवा टप्पा - १७ एप्रिल मतदान
>> सहावा टप्पा- २२ एप्रिल मतदान
>> सातवा टप्पा- २६ एप्रिल मतदान
>> आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान

पाचही राज्यांचा निवडणूक निकाल एकाच दिवशी म्हणजे २ मे रोजी जाहीर होणार (Assembly Elections Result On 2nd May 2021)

Web Title: assembly elections 2021 here are all dates and result day all you need to know about election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.