Malvika Sood : सोनू सूदची बहीण मालविका पिछाडीवर; काँग्रेसला धक्का, आपची मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:17 AM2022-03-10T10:17:12+5:302022-03-10T10:38:10+5:30

Malvika Sood And Punjab Assembly Elections 2022 Result : सोनू सूदची बहीण मालविका सूदने राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतली. मालविका पंजाब विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे.

Assembly Elections 2022 Result moga district result sonu sood sister Malavika Sood | Malvika Sood : सोनू सूदची बहीण मालविका पिछाडीवर; काँग्रेसला धक्का, आपची मुसंडी

Malvika Sood : सोनू सूदची बहीण मालविका पिछाडीवर; काँग्रेसला धक्का, आपची मुसंडी

Next

नवी दिल्ली - पंजाबमध्ये 'आप'ने मुसंडी मारली असून सुरुवातीच्या कलांमध्ये ६४ जागांवर आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये काही वेळापूर्वी आघाडीवर असलेले काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धू हे पिछाडीवर गेले आहेत. ते आता दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी दोन जागांवर पिछाडीवर आहेत. सोनू सूदची बहीण मालविका सूदने (Malvika Sood) राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतली. मालविका पंजाब विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे. पंजाबच्या मोगा विधानसभा मतदारसंघातून तिला काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. पण सुरुवातीचे कल पाहता मालविका सूद पिछाडीवर आहे. 

मोगा विधानसभा जागेवर, आतापर्यंत झालेल्या एकूण 15 विधानसभा निवडणुकांपैकी ही जागा 10 वेळा काँग्रेस पक्षाकडे गेली आहे. 1977 ते 2017 पर्यंतच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने येथून सहा वेळा विजय मिळवला आहे. 2017 च्या निवडणुकीत हरजोत सिंग कमल विजयी झाले होते. काही दिवसांपूर्वी सोनू सूद देखील बहिणीच्या प्रचारासाठी मोगा येथेच होता. तेव्हा सोनू सूदला मोगा येथे मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. पंजाबमध्ये सुरू असलेल्या मतदानादरम्यान सोनू सूदची कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली होती. मतदान केंद्रावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनू सूदची कार जप्त करून त्याला घरी पाठवण्यात आलं होतं.

सोनू सूदला निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखलं; जप्त केली कार

मोगा जिल्ह्याचे पीआरओ प्रभदीप सिंह यांनी  जर सोनू सूद घराबाहेर पडला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असं म्हटलं होतं. सोनू सूद मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी शिरोमणी अकाली दलाने तक्रार केली होती. त्याचवेळी सोनू सूदने हे आरोप फेटाळून लावले होते. आपण फक्त मतदान केंद्राबाहेरील काँग्रेसच्या बूथला भेट देत होतो असं म्हटलं होतं. "मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व करत नाही. मी आजही एक सामाजिक कार्यकर्ताच आहे आणि जे काम आधीपासून करत होतो तेच आजही करत आहे. माझी बहीण देखील माझ्यासारखीच लहानपणापासूनच राजकारणापेक्षा समाजकार्याशीच अधिक जोडली गेलेली आहे. आमची ही चौथी पिढी आहे की जी सामाजिक कार्यात आहे. माझे आजोबा आणि पूर्वजांनी मोगामध्ये अनेक शाळा, रुग्णालयं उभारली आहेत."

"माझ्या आईनं आयुष्यभर लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं आहे. तर माझ्या वडिलांचं कपड्याचं दुकान होतं आणि ज्या गरीबांना लग्नाचा खर्च करणं परवडत नव्हतं अशांना माझे वडील मदत करत आले आहेत. आम्ही देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन समाजकार्य करत आहोत. आताही मालविकानं मोगा मधील जनतेचं मोफन लसीकरण केलं आहे. शिक्षण असो किंवा मग आरोग्य सर्वच गोष्टींमध्ये मालविका आधीपासूनच खूप सक्रिय आहे. लोकांनी तिला राजकारणात येण्यासाठी आग्रह केला. तिनं माझ्याशीही याबाबत चर्चा केली आणि समाज बदलण्यासाठी प्रशासनात येणं गरजेचं असल्याचं तिचं मत आहे. त्यामुळेच मालविका आज राजकीय क्षेत्रात पाऊल टाकत आहे" असं सोनू सूदने याआधी म्हटलं आहे. 
 

Web Title: Assembly Elections 2022 Result moga district result sonu sood sister Malavika Sood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.