शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लोकसभेसोबत आंध्र, ओडिशा, अरुणाचल व सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 5:11 AM

मात्र जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती प्रतिकूल

नवी दिल्ली : लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणचाल प्रदेश आणि सिक्किम या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही घेण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केला.मात्र, दहशतवादामुळे नाजूक स्थिती असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणूक न घेण्याचे आयोगाने ठरविले. परिणामी गेल्या जूनपासून लोकनियुक्त सरकार नसलेल्या या अशांत राज्यास त्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या चार राज्यांमध्ये ज्या दिवशी लोकसभेसाठी मतदान होईल त्याच दिवशी विधानसभेसाठी मतदान घेतले जाईल. विधानसभांचे निकालही लोकसभेसोबतच २३ मे रोजी जाहीर होतील.आंध्र प्रदेशदक्षिणेकडील या राज्यात लोकसभेच्या सर्व २५ जागा व विधानसभेच्या १७५जागांसाठी ११ एप्रिल या एकाच दिवशी मतदान होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत तेलगु देसम व भाजपा आघाडीने १७६ पैकी १२६ जागा जिंकून मोठे यश ंसंपादित केले होते. मात्र, आता तेलगु देसम ‘रालोआ’मधून बाहेर पडल्याने या वेळी चित्र वेगळे असेल. गेल्या निवडणुकीतही तेदप-भाजपा आघाडी व विरोधक यांच्या मतांच्या टक्क्यात ०.२ टक्का एवढा निसटता फरक होता. वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी ३,६४८ किमीच्या पदयात्रेनंतर अधिक बळकट झाले आहेत. तेलगु देसमला सरकारविरोधी भावनेला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे आंध्रमधील निवडणूक चुरशीची होणे अपेक्षित आहे.ओडिशाया पूर्वेकडील राज्यात ११, १८, २३ व २९ एप्रिल अशा चार टप्प्यांत लोकसभा व विधानसभेचे मतदान होईल. येथे विधानसभेच्या १४७ व लोकसभेच्या २१ जागा आहेत सलग १९ वर्षे सत्तेवर असलेले बिजू जनता दल व त्यांचे प्रमुख व मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना सरकारविरोधी जनभावना व नव्या उमेदीने कामाला लागलेली भाजपा व काँग्रेस या विरोधकांचा सामना करावा लागेल. गेल्या निवडणुकीत बिजदने लोकसभेच्या २० व विधानसभेच्या ११७ जागा जिंकल्या होत्या. ३३ टक्के मतदारसंघांत महिला उमेदवार उभे करण्याचा बिजदाचा निर्णयही इतरांपुढे नवे आव्हान उभे करू शकेल.सिक्किमईशान्येकडील या राज्यात लोकसभेची एक तर विधानसभेच्या ४० जागा आहेत. मुख्यमंत्री पवन चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ) सलग सहाव्या वेळेला सत्तेवर येते का, हे या निवडणुकीचे मुख्य आकर्षण असेल. गेल्या निवडणुकीत ‘एसडीएफ’ने ४०पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. भाजपाने स्थापन केलेल्या नॉर्थइस्ट डेमोक्रॅटिक अ‍ॅलायन्सचा घटक असूनही ‘एसडीएफ’ स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सरकारकडून किमान उत्पन्न म्हणून काही ठराविक रक्कम दरमहा देण्याची देशातील पहिली योजना राबविण्याच्या घोषणेचे ‘एसडीएफ’ला किती फायदा होतो, हे पाहणेही लक्षणीय ठरेल. येथे ११ एप्रिल रोजी मतदान होईल.अरुणाचल प्रदेशचीनच्या सीमेला लागून असलेल्या या ईशान्येकडील राज्यात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या ६० जागा आहेत. या दोन्हींचे मतदान ११ एप्रिल रोजी होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे काँग्रेस सत्तेवर आली होती. परंतु बहुसंख्य आमदार फुटून भाजपामध्ये गेल्याने त्या पक्षाचे पेमा खांडू मुख्यमंत्री झाले. परंतु गेल्या डिसेंबरपासून पक्ष सोडून गेलेले बरेच जण पुन्हा काँग्रेसकडे आले आहेत. या आयाराम गयारामांच्या राजकारणाचे निवडणुकीत कसे पतिबिंब पडते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९OdishaओदिशाAndhra Pradeshआंध्र प्रदेशArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशsikkimसिक्किमJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक