उत्तर पूर्वेतील ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, मेघालय आणि नागालँड राज्यात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, तिन्ही राज्यांची मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे, आता पुढील महिन्यात देशातील या तीन राज्यांत राजकीय धुरळा उडणार आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
नागालँडमध्ये 12 मार्च, मेघालयमध्ये 15 मार्च आणि त्रिपुरामध्ये 22 मार्चला विधानसभेचा कार्यकाळ संपतो. त्यामुळे फेब्रुवारीअखेर निवडणूका होण्याची दाट शक्यता आहे.
मेघालय विधानसभा, जागा- 60, बहुमत- 31मेघालयात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणूक झाली. काँग्रेसला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपला येथे केवळ 2 जागा मिळू शकल्या. नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीईपी) 19 जागा मिळाल्या. पीडीएफ आणि एचएसपीडीपीने मिळून सरकार स्थापन केले. त्यांनी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स (MDA) ची स्थापना केली. गेल्या तीन महिन्यांपासून येथील पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने 40 आणि एनपीपीने 58 उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे.
त्रिपुरा विधानसभा, जागा- 60, बहुमत- 31
राज्यात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणुका झाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. 35 जागा मिळाल्या. डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला भाजपने उद्ध्वस्त केला होता. यापूर्वी बिप्लब देव यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते, परंतु मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले.
नागालँड विधानसभा, जागा-60, बहुमत-31
नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे सरकार आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. 2018 मध्ये दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. त्यानंतर एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या. यानंतर NDPP ने NPP आणि JDU सोबत सरकार स्थापन केले.