शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

विधानसभा निवडणूक: भाजप हरयाणामध्ये हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात; काँग्रेससाेबत असणार थेट लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:24 PM

मतदानापूर्वी काँग्रेस पक्ष राज्यात बसयात्रा काढण्याची तयारी करत आहे, तर भाजप रथयात्रा काढण्याचा विचार करत आहे.

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड: हरयाणात १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यंदा भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून हॅट्ट्रिक करण्यासाठी रणनीती आखत आहे.

माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वात भाजप सरकारच्या विरोधात हरयाणा मांगे हिसाब, हे अभियान सुरू आहे, तर दुसरीकडे राज्याच्या दौऱ्यावर निघालेले मुख्यमंत्री नायब सिंह सैनी प्रत्येक घटकाला खुश करण्यासाठी घोषणा करत आहेत. मतदानापूर्वी काँग्रेस पक्ष राज्यात बसयात्रा काढण्याची तयारी करत आहे, तर भाजप रथयात्रा काढण्याचा विचार करत आहे.

तिकिटांसाठी दाेन्ही पक्षांत रस्सीखेच

९० जागांसाठी काँग्रेसला तिकिटासाठी २५०० पेक्षा जास्त अर्ज मिळाले आहेत. तर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी म्हटले आहे की, भाजप यंदा कार्यकर्त्यांच्या पसंतीनुसार तिकिटावर निर्णय घेऊ.हरयाणात सध्या काँग्रेसचे २८ आमदार आहेत. यात विरोधी पक्षनेते हुड्डा वगळता सर्व आमदारांनी पुन्हा तिकिटासाठी अर्ज दिला आहे. एकूण ९० जागांपैकी १७ जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान यांनी सांगितले की, अर्जाची यादी दिल्लीत पाठविली जाईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अन्य दिग्गज नेते तिकीट वाटपावर मंथन करतील. 

हरयाणात निवडणुकीत कोण मारणार बाजी? या आहेत जमेच्या, कमकुवत बाजू

 

  • भारतीय जनता पक्ष

- हरयाणात १० वर्षे सत्तेत असलेल्या भाजपची बूथस्तरापर्यंत मजबूत संघटनात्मक बांधणी, निवडणुकांच्या पूर्वतयारीत आघाडी. - भाजपला सत्ताविरोधी भावनेचा (अँटी इन्कंबन्सी) सामना करावा लागणार.- भाजपची मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, त्यांचे  पूर्ववर्ती एम. एल. खट्टर यांची स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक प्रशासन यांवर भिस्त.- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी पाच जागांवर विजय मिळवणाऱ्या काँग्रेसचेजोरदार आव्हान.

  • काँग्रेस

- दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भूपिंदर सिंग हुडा, कुमारी सेलजा आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांचा वैयक्तिकरीत्या मोठा प्रभाव.- हुड्डा आणि सेलजा यांच्यातील दुहीचा फटका बसण्याची शक्यता. - राज्यात काँग्रेस सत्तेत असताना झालेल्या घोटाळ्यांचे भाजपकडून भांडवल.- काँग्रेसला सत्ताविरोधी लाटेचा फायदा होऊ शकतो.- आयएनएलडी आणि जेजेपी यांसारख्या पक्षांमध्ये जाट मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसला फटकाबसू शकतो.  

टॅग्स :HaryanaहरयाणाElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग