काल तेलंगणा विधासभा निवडणुकीचे निकाल समोर आले. काँग्रेसने बीआरएसला धक्का देत १० वर्षानंतर सत्तांतर केले. काँग्रेसने ६४ विधानसभेच्या जागा तर भाजपने ३९ जागेवर विजय मिळवला. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी सोमवारी मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राज्य विधानसभा विसर्जित केली.
23 लाख लोक कुठे जाणार?; इस्रायलचा दक्षिण गाझा रिकामा करण्याचा आदेश, बॉम्बफेक सुरू
रविवारी तेलंगणामध्ये काँग्रेसने ६४ विधानसभेच्या जागा जिंकल्यानंतर आणि के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती सरकारची सुमारे १० वर्षांची सत्ता संपुष्टात आणली.
विद्यमान विधानसभेत १०१ सदस्य असलेल्या बीआरएसला ३९ जागा मिळाल्या, तर भाजपला आठ जागा मिळाल्या. एआयएमआयएमला सात आणि सीपीआयला एक जागा मिळाली.
मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी तेलंगणाच्या राज्यपालांची भेट घेतली आणि तेलंगणा राज्य विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तेलंगणा राज्यातील ११९ मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रतिनिधींची यादी सुपूर्द केली.