विधानसभा अध्यक्षपद; शर्यतीत नितीन राऊतही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 09:28 AM2021-07-01T09:28:59+5:302021-07-01T09:29:24+5:30
पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी श्रेष्ठींना राज्यात दलित मतदारांना पक्षाकडे वळवण्याची जी सूचना केली होती
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस श्रेष्ठी संग्राम अनंतराव थोपटे यांच्यासह राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाचाही विचार करीत आहेत.
सूत्रांनी सांगितले की, पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी श्रेष्ठींना राज्यात दलित मतदारांना पक्षाकडे वळवण्याची जी सूचना केली होती त्यानुसार नितीन राऊत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत समाविष्ट झाले. दलित मतदारांना आपलेसे करण्यावरही मंथन सुरू आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांना राज्य मंत्री बनवले जावे.
वर्षा गायकवाड़ आधीच मंत्रिमंडळात आहेत. याचा सरळ अर्थ असा की, काँग्रेसचे नेतृत्व दलित प्रतिनिधित्वाबद्दल गंभीर आहे.
नितीन राऊत दिल्लीत पक्ष श्रेष्ठींच्या सतत संपर्कात असून दलित नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.