शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

परदेशांत लपलेल्या १९ खलिस्तानी दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त होणार; एनआयए अॅक्शनमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 11:25 PM

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत ज्या लोकांची नावे आहेत, त्या सर्वांवर देशविरोधी कारवायांचा आरोप आहे. अनेकवेळा केंद्र सरकारने हे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडले आहेत.

खलिस्तानी दहशतवाद्यांवरून कॅनडा आणि भारतामध्ये तणाव वाढला आहे. अशातच एनआयएने परदेशांत लपलेल्या दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. 

कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि दुबईमध्ये लपलेल्या 19 खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावरील केसेसचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. एनआयएच्या पथकांनी प्रकरणांचा अभ्यास सुरू केला आहे. या जुन्या प्रकरणांत त्यांच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. 

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत ज्या लोकांची नावे आहेत, त्या सर्वांवर देशविरोधी कारवायांचा आरोप आहे. अनेकवेळा केंद्र सरकारने हे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडले आहेत.फरार झालेल्यांच्या यादीत परमजीत सिंग पम्मा, वाधवा सिंग बब्बर उर्फ ​​चाचा, कुलवंत सिंग, जेएस धालीवाल, सुखपाल सिंग, हरप्रीत सिंग उर्फ ​​राणा, सरबजीत सिंग, कुलवंत सिंग उर्फ ​​कांता, हरजप सिंग उर्फ ​​जप्पी सिंग, रणजीत सिंग नीता, गुरमीत सिंग अली यांचा समावेश आहे. बग्गा उर्फ ​​बाबा, गुरप्रीत सिंग उर्फ ​​बागी, ​​जसमीत सिंग हकीमजादा, गुरजंत सिंग ढिल्लोन, लखबीर सिंग रोडे, अमरदीप सिंग पुरेवाल, जतिंदर सिंग ग्रेवाल, दपिंदरजीत आणि एस हिम्मत सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. 

शनिवारी एनआयएने बंदी घातलेल्या शिख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांची चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्ता जप्त केली होती. तर हरदीप सिंह निज्जरची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.