शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
3
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
4
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
5
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
6
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
7
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
8
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
9
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
10
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
11
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
12
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
13
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
14
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
15
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
16
वरमाला पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
17
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
18
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
19
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
20
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी

ईडीच्या छाप्यात ३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; कोट्यवधि जमवणारा सौरभ शर्मा कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 08:22 IST

मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यात टाकण्यात आलेल्या विविध छाप्यांमध्ये ३३ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त

MP Money Laundering Case :अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून ३३ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या आठवड्यात ईडीने पीएमएलए अंतर्गत भोपाळ, ग्वाल्हेर आणि जबलपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले होते. सौरभ शर्मा आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली होती. ईडीने सौरभ शर्मा आणि त्याचे जवळचे सहकारी चेतन सिंग गौर, शरद जैस्वाल आणि रोहित तिवारी यांच्या घरावर छापे टाकले होते. 

 ईडी, आयकर विभाग आणि मध्य प्रदेश लोकायुक्तांचे विशेष पोलीस आस्थापना (एसपीई), राज्य सरकारचे भ्रष्टाचार विरोधी पथक सौरभ शर्मा या व्यक्तीच्या शोधात आहेत. १९ डिसेंबर रोजी भोपाळ जिल्ह्यातील एका गावात एका सोडलेल्या वाहनातून ११ कोटी रुपयांची रोकड आणि ५२ किलो सोने जप्त करण्यात आले होते. तपासादरम्यान, सौरभ शर्माने त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि इतर अनेक कंपन्यांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता मिळवली. सौरभ शर्माने आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि कंपन्यांच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांचे संचालक त्याच्या अगदी जवळचे होते.

भोपाळ, ग्वाल्हेर आणि जबलपूरमध्ये तपास यंत्रणांनी ८ ठिकाणी छापे टाकले असता चेतन सिंह गौरच्या नावावर ६ कोटी रुपयांहून अधिकची एफडी सापडली. तसेच सौरभ शर्माच्या कुटुंबातील सदस्य आणि कंपन्यांच्या नावावर ४ कोटींहून अधिक रक्कम बँकेत जमा आहे.. याशिवाय कुटुंबातील सदस्य आणि कंपन्यांच्या नावावर २३ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत.

सौरभ शर्मा कोण आहे?

ग्वाल्हेरचे रहिवासी असलेला सौरभ शर्मा उर्फ ​​चिनू हे स्पर्धा परीक्षांचे उमेदार होता. १२th फेल हा बहुचर्चित चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहे. अशा नागरी सेवा परीक्षांची तयारी करत असलेल्या अनेक ग्रुपमध्ये तो सहभागी होता. राज्य नागरी सेवा परीक्षेतही तो मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचला होता. त्याचे वडील सरकारी कर्मचारी होती. वडिलांच्या निधनानंतर शर्मा याने अनुकंपा तत्त्वावर वाहतूक विभागात हवालदार म्हणून नियुक्ती मिळवली. सूत्रांनी मात्र अनुकंपा तत्त्वावर त्याची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि शेवटी शर्माने राजीनामा दिला. त्यानंतर त्याने बांधकाम व्यवसाय सुरू केला.

१९ डिसेंबर रोजी, लोकायुक्तच्या पथकाने भोपाळमध्ये शर्माशी संबंध असलेल्या दोन ठिकाणी छापे टाकले आणि सोने आणि चांदी व्यतिरिक्त २.१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. मेंदोरी गावात एका शेतात उभ्या असलेल्या वाहनाबाबत आयकर विभागाला माहिती मिळाल्यानंतर खरी वसुली झाली. सरकारमध्ये संपर्क असलेल्या एका बिल्डरच्या घरावर आयकर विभागाचे अधिकारी छापे पडल्याने सगळीकडेच याची चर्चा सुरु झाली होती. ‘प्रादेशिक परिवहन अधिकारी’ (आरटीओ) प्लेट आणि सायरन असलेले वाहन पथकाला सापडल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली. गाडीत ११ कोटी रुपये रोख आणि ५२ किलो सोने सापडले.

सौरभ शर्मा सध्या बेपत्ता आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. २७ डिसेंबर रोजी, ईडीने शर्मा आणि त्याचे नातेवाईक आणि व्यावसायिक सहकारी यांच्याशी संबंध असलेल्या परिसराची झडती घेतली. आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. तर लोकायुक्तांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला शर्मा याच्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारी