सहायक पोलीस निरीक्षक देशमुख व पाटील निलंबित
By admin | Published: October 25, 2016 12:48 AM
जळगाव: प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी एका हॉटेल व्यावसायिकाकडून पाच हजार रुपये व दारुची लाच घेणारे अडावद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक योगेश देशमुख व सहायक फौजदार नीळकंठ पाटील यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. देशमुख यांना विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे तर पाटील यांना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी निलंबित केले.
जळगाव: प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी एका हॉटेल व्यावसायिकाकडून पाच हजार रुपये व दारुची लाच घेणारे अडावद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक योगेश देशमुख व सहायक फौजदार नीळकंठ पाटील यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. देशमुख यांना विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे तर पाटील यांना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी निलंबित केले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गेल्या आठवड्यात दोन्ही अधिकार्यांना लाच घेताना पकडले होते. या घटनेनंतर सहायक निरीक्षक देशमुख घराला कुलूप लावून पळून गेले होते तर पाटील यांना अटक करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांनी सोमवारी सकाळी दोघांच्या निलंबनाबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक सुपेकर यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर संध्याकाळी दोघांच्या निलंबनाचे आदेश निघाले. दरम्यान, देशमुख यांचे अडावद येथील शासकीय निवासस्थान सील करण्यात आले आहे. त्यांच्या शोधार्थ एसीबीचे पथक जळगाव व दिंडोरी येथे गेले होते.