मुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक यशस्वी राजकीय व्यक्ती, पत्रकार होतेच त्याहून ते उत्तम कवी होते. सामाजिक, सांस्कृतिक एकतेचा संदेश ते आपल्या कवितांमधून देत असत. त्यांच्या कवितांमधून ते विश्वशांतीचे प्रणेते असल्याचे दिसून येते.
भारत-पाकिस्तान पड़ोसी, साथ-साथ रहना है,प्यार करें या वार करें, दोनों को ही सहना है,तीन बार लड़ चुके लड़ाई, कितना महँगा सौदा,रूसी बम हो या अमेरिकी, खून एक बहना है।जो हम पर गुजरी, बच्चों के संग न होने देंगे।जंग न होने देंगे.
ब्रिटिशांनी देश सोडताना भारताची फाळणी केली. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती कायम राहिली. दहशतवादाने भारताला सतत त्रास होत राहिला, शेकडो जवानांना हौतात्म्य आले, पण प्रश्न सुटलाच नाही. यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी कवितेतून भाष्य केले होते. महासत्तांकडून विकत घेतलेली शस्त्रे शेवटी आपलंच रक्त सांडणार आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ते युद्धविहिन जगाचे प्रणेते किंवा युद्धाविन जगाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. ते म्हणत, हम जंग न होने देंगे!विश्व शांति के हम साधक हैं, जंग न होने देंगे!कभी न खेतों में फिर खूनी खाद फलेगी,खलिहानों में नहीं मौत की फसल खिलेगी,आसमान फिर कभी न अंगारे उगलेगा,एटम से नागासाकी फिर नहीं जलेगी,युद्धविहीन विश्व का सपना भंग न होने देंगे। जंग न होने देंगे.
विश्वशांतीचे आम्ही साधक आहोत. आता आमच्या शेतांमध्ये मृत्यूचे पिक येणार नाही, नागासाकी सारखे भयानक परिणाम या जगाला पुन्हा भोगावे लागणार नाहीत. यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा मताचे अटलबिहारी वाजपेयी होते. राजकीय पटलावर तेही अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडताना विश्वशांतीचा विचार कायम ठेवून ध्येयाने कार्य करत राहिलेले वाजपेयी इतर समकालीन नेत्यांपेक्षा अशाच गुणांमुळे वेगळे दिसून येतात.
(Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!)
(Atal Bihari Vajpayee: पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास)