शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Atal Bihari Vajpayee Death: ‘तेजस’ ची ‘अटल’ भरारी; इंजिननिर्मितीला मिळाले फ्रान्सचे सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 9:40 PM

Atal Bihari Vajpayee Death: लढाऊ विमानासाठी इंजिन तयार करणे हे एक कठिण काम असते. जगातील केवळ निवडक विकसित देश हे काम करीत असताना भारताला या श्रेणीत नेण्याचे महत्त्वाचे कार्य अटलबिहारी वाजपेयींनी केले.

- चिन्मय काळेमुंबई : लढाऊ विमानासाठी इंजिन तयार करणे हे एक कठिण काम असते. जगातील केवळ निवडक विकसित देश हे काम करीत असताना भारताला या श्रेणीत नेण्याचे महत्त्वाचे कार्य अटलबिहारी वाजपेयींनी केले. ‘तेजस’ या लढाऊ विमानाच्या निमित्ताने ‘कावेरी’ नावाच्या या इंजिन निर्मितीला वाजपेयींच्या धोरणी नेतृत्वात बळ मिळाले होते.स्वदेशी बनावटीचे ‘लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट’ (एलसीए)या लढाऊ विमानाचे १९८७ पासून भारतात संशोधन सुरू होते. पण या विमानाची पहिली यशस्वी चाचणी ४ जानेवारी २००१ ला पंतप्रधान या नात्याने वाजपेयी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे झाली. जगातील सर्वात छोट्या या लढाऊ विमानाचे ‘तेजस’ हे नामकरणसुद्धा त्यावेळी वाजपेयींनीच केले. परंतु तो काळ अमेरिकेकडून भारतावर लादण्यात आलेल्या निर्बंधाचा होता. या निर्बंधाचा अडसर ‘तेजस’ च्या पुढील प्रवासात होता. तो वाजपेयींनीच्या कुशलतेने दूर झाला.१९९८ च्या पोखरण अणुचाचणीमुळे अमेरिकेने भारतावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आणले होते. त्यामुळे ‘तेजस’ला बसविण्यात येणाऱ्या ‘कावेरी’ इंजिनासाठी आवश्यक असलेले तांत्रिक सहकार्य अमेरिका किंवा अन्य देशांमधून मिळवणे भारताला कठीण झाले होते. ‘तेजस’च्या निर्मितीतील हा अडथळा दूर करण्यात अटलबिहारी वाजपेयींची प्रखर मुत्सद्देगिरी त्यावेळी कामात आली. फ्रान्सकडून या इंजिनाच्या निर्मितीसाठी तांत्रिक सहकार्य मिळविण्यात डीआरडीओला यश आले. फ्रान्समधील साफरान (स्नेकमा) कंपनीने कावेरी निर्मितीसाठी सहकार्य दिले. निर्बंधांचा दबाव झुगारुन फ्रान्स सरकारला या सहकार्यासाठी तयार करण्याची कामगिरी डीआरडीओ केवळ वाजपेयींमुळेच करू शकला.आज ‘एलसीए तेजस’ हे विमान हवाईदलाच्या ताफ्यात समाविष्ट आहे. अन्य काही तांत्रिक कारणांमुळे सध्याच्या ‘तेजस’ ला कावेरी इंजिन बसविण्यात आलेले नाही. पण ‘तेजस २’ ही पुढील टप्प्यातील अत्याधुनिके विमाने ‘कावेरी’ने सज्ज केली जाणार आहेत. त्याखेरीज विमाननिर्मिती करणा-या विदेशी कंपन्यांना या इंजिनांची निर्यात करण्याचेही डीआरडीओचे लक्ष्य आहे. याचे श्रेय वाजपेयींनाच जाते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी