नवी दिल्लीः बाधाएँ आती है आएँ, घिरे प्रलय की घोर घटाएँ पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएँ निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगाकदम मिलाकर चलना होगा...या आपल्या कवितेप्रमाणेच, प्रत्येक संकटाशी न डगमगता लढलेले, सत्तेचा मोह न बाळगता हसत-हसत राजीनामा देण्याचं धारिष्ट्य दाखवलेले आणि एक-दोन नव्हे तर तब्बल 22 पक्षांसोबत 'कदम मिलाकर' सरकार चालवलेले देशाचे माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं देशाच्या राजकीय इतिहासातील 'अटल' अध्यायाची सांगता झाल्याची भावना व्यक्त होतेय. माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयींचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 66 दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते.
Atal Bihari Vajpayee Death: 'अटल' अध्यायाची सांगता; माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:37 PM