नवी दिल्ली - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. दिल्लीतीलएम्स रुग्णालयात देशातील दिग्गज नेत्यांनी गर्दी केली आहे. तर निम्मं मंत्रिमडळ रुग्णालयात दाखल झाले आहे. तसेच भाजपशासित सर्वच राज्यातील मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे देशभरातून अटलजींच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
अटलबिहारी यांची प्रकृती चिंताजनक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच राजकीय दिग्गज एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर वाजपेयींचे संपूर्ण कुटुंब दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले आहे. मध्य प्रदेशमधील खासदार आणि अटलबिहारी यांचे पुतणे अनुप मिश्रा, करुणा शुक्ला आणि कुटुबातील इतर सदस्यही दिल्लीत दाखल झाले आहेत. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडूनही काही ठराविक वेळानंतर अटलबिहारींच्या प्रकृतीविषयी विशेष बुलेटीनद्वारे माध्यमांना माहिती देण्यात येत आहे. एककीडे वाजपेयी यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी 'रुग्णालयात दवा तर देशभर दुवा' मागण्यात येत आहे. देशभरातील अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अटलजींच्या प्रकृतीसाठी यज्ञ करण्यात येत आहे. तर कुठे देवाला प्रार्थना म्हटली जात आहे, तर कुठे नमाज पडला जात आहे. कुठे हात जोडले जात आहेत. तर कुठे दर्ग्यावर चादर चढवली जात आहे.
लुधियानातील सक्तेश्वर महादेव आश्रमात अटलजींच्या प्रकृती स्वास्थतेसाठी यज्ञ
लखनौ येथील एका कॉन्वेंट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची प्रार्थना
मध्य प्रदेशमधील युवक काँग्रेस नेत्याने दर्ग्यावर चढवली चादर
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना अश्रू अनावर