शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

आॅलिम्पिकमध्ये खेळाडूंनी वर्तनाची छाप सोडावी

By admin | Published: August 01, 2016 1:39 AM

भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असेल त्याच वेळी रिओमध्ये कुठेतरी तिरंगा नक्कीच फडकताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय पथकाने केवळ खेळाच्या मैदानावरच नाही तर आपल्या वर्तनाने जगाच्या हृदयात स्थान मिळवण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असेल त्याच वेळी रिओमध्ये कुठेतरी तिरंगा नक्कीच फडकताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी भारताच्या ११९ सदस्यांच्या पथकाला शुभेच्छा देण्यासाठी रविवारी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमपासून जवाहरलाल नेहरू स्टेडियमपर्यंत ‘रन फॉर रिओ’ला रविवारी पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक खेळाडूने हा टप्पा गाठण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून, आॅलिम्पिकमध्ये हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी आशा आहे. यापूर्वी खेळाडूंना तयारी करण्यासाठी अधिक कालावधी मिळत नव्हता; पण आता खेळाडूंना तेथील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी १५ दिवसांचा अवधी मिळतो.’’ कार्यक्रमाला क्रीडामंत्री विजय गोयल प्रामुख्याने उपस्थित होते. आॅलिम्पिकचे टी-शर्ट परिधान केलेले २० हजार शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करीत रिओमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)‘मन की बात’मध्ये रिओचीच चर्चारेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी या वेळी देशवासीयांना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी शुभेच्छा देण्याचे आवाहन केले. त्यासाठी मी पोस्टमनची भूमिका बजावण्यास तयार असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी ५ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकचा उल्लेख करताना म्हटले की, विश्वातील सर्वांत प्रतिष्ठेचा खेळाचा महाकुंभ सुरू होत असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविण्याची जबाबदारी देशवासीयांची आहे. सर्वांनी खेळाडूंना शुभेच्छा द्यायला हव्यात. या खेळाडूंपर्यंत तुमचा संदेश पोहोचविण्यासाठी मी पोस्टमनची भूमिका बजावण्यास तयार आहे. देशवासी मला नरेंद्र मोदी अ‍ॅपवर खेळाडूंच्या नावाने शुभेच्छा पाठवू शकतात. मी तुमच्या शुभेच्छा खेळाडूंपर्यंत पोहोचविणार.’