नवी दिल्ली: काल(दि.15) रात्री उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या समोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आपल्या मृत्यूची भविष्यवाणी अतिकने 19 वर्षांपूर्वीच केली होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्याने पत्रकाराशी संवाद साधताना आपला मृत्यू कसा होणार, हे सांगितलं होतं.
'एनकाउन्टर होईल किंवा...'अतीक अहमदने 2004 मध्ये फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. त्यावेळी तो अनेकदा स्थानिक पत्रकारांशी अनौपचारिक बैठका घेत असत. अशाच एका भेटीत त्याने आपल्या हत्येची भीती व्यक्त केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, माझा पोलीस एनकाउंटर करतील किंवा माझ्यासारखाच कुणीतरी मला ठार करेल आणि मी रस्त्याच्या कडेला निपचीत पडलेला असेल, असे तो 19 वर्षांपूर्वी म्हणाला होता.
नेहरूंशी स्वतःची तुलना 2004 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याने पत्रकारांशी संवाद साधताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी स्वतःची तुलना केली होती. या जागेवरून जवाहरलाल नेहरू खासदार निवडून आले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? या प्रश्नावर आतिकने उत्तर दिले की, पंडितजींप्रमाणे मीदेखील नैनी जेलमध्ये आहे. त्यांनी इथे पुस्तके लिहिली आणि मी हिस्ट्रीशिटर असल्यामुळे इथे आलोय.
अतिकचे शेवटचे शब्द काय होतेप्रयागराजमध्ये अतिकची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्याच्या काही क्षणापूर्वी पत्रकारांनी अतिकला विचारले की, त्याला मुलगा असद अहमद याच्या अंतिम यात्रेला का नेण्यात आले नाही? यावेळी त्याने पोलिसांनी अंत्यविधीला नेले नाही, असे म्हणाला. तेवढ्यात तिघांनी त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. अतिक आणि अशरफवर हल्लेखोरांनी 16-17 गोळ्या झाडल्या. या घटनेत त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.