प्रयागराज: माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याची शनिवारी रात्री पोलिसांसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना तीन तरुणांनी घडवून आणली. हे तिघेही पत्रकार असल्याचे भासवत पोलिसांच्या ताफ्याजवळ पोहोचले होते. यावेळी हल्लेखोरांनी 18 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 8 गोळ्या अतिक अहमदला लागल्या. अतिकच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे.
अतिक आणि अशरफचे रविवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी अतिकच्या शरीरातून एकूण 8 गोळ्या काढल्या. त्यापैकी 1 डोक्यात, 1 मानेत, 1 छातीत आणि 1 कमरेत घुसली आहे. दुसरीकडे, अशफला 5 गोळ्या लागल्या आहेत. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आजच त्यांच्यावर दफनविधी होणार असल्याची माहिती आहे.
हल्लेखोरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने अतिक-अशरफ यांच्या तिन्ही हल्लेखोरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. घटनेच्या वेळी पोलिसांनी तिघांनाही घटनास्थळावरून पकडले होते. तिघांचीही कोठडीत चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून हे हत्याकांड घडवण्याचे कारणही सांगितले. पोलिसांनी या तिघांची कुंडली तपासली असता, ते हिस्ट्रीशीटर असल्याचे समोर आले. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
कासारी-मासारीत दफनविधी होणारप्रयागराजमधील कासारी मसारी स्मशानभूमीत अतिक आणि अशरफ यांच्यासाठी कबर खोदण्यात आली आहे. या दोघांवर आजच दफनविधी होणार आहे. यापूर्वी शनिवारी अतिक अहमदचा मुलगा असद यालाही याच स्मशानभूमीत दफन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळीच असदचा मृतदेह झाशीहून प्रयागराजला आणण्यात आला होता. झाशीच्या बारागाव पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी यूपी एसटीएफने त्याला चकमकीत ठार केले होते.
मारेकऱ्यांची ओळख पटलीअतिक आणि अशरफ यांची हत्या करणारा लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे, तर अरुण मौर्य हा कासगंजचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, तिसरा आरोपी सनी हा हमीरपूर जिल्ह्यातील आहे. चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी आपला एकच पत्ता दिला आहे. पोलिस त्यांच्या जबाबाची पडताळणी करत आहेत. तपासात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, तिन्ही आरोपी अतिक आणि अशरफ यांची हत्या करण्याच्या उद्देशानेच प्रयागराज येथे आले होते.