अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या घटनेतील अजून काही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांकडून एकही फोन जप्त केलेला नाही. या तिघांची एकमेकांची ओळख कुठे झाली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तिन्ही मारेकरी वेगवेगळ्या शहरातील आहेत. अशा परिस्थितीत ते प्रयागराजमध्ये कसे पोहोचले आणि त्यांनी एकमेकांशी संपर्क साधून संपूर्ण घटना कशी घडवून आणली. तिन्ही मारेकऱ्यांसोबत एक हँडलरही असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिन्ही मारेकरी त्याच्या सांगण्यावरून काम करत होते. त्याने ही घटना घडवून आणली तेव्हा चौथा व्यक्ती तिथून सहज पळून गेला.
लवलेश, सनी आणि अरुण या तिनही मारेकऱ्यांना घेऊन पोलिसांचे पथक प्रतापगडहून प्रयागराजला पोहोचले. पोलिसांनी कोर्टाकडून चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीसाठी पोलिसांनी १०० हून अधिक प्रश्नांची यादी तयार केली आहे. तिघे एकमेकांच्या संपर्कात कसे आले? याशिवाय ही हत्या करण्यामागे त्यांचा हेतू काय होता. त्यांना परदेशी शस्त्रे कोणी पुरवली होती, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.
नकोशी! अखेर भारताने चीनला मागे टाकले, देशाची लोकसंख्या जगात 'नंबर १'
घटनास्थळी चौथा व्यक्तीही उपस्थित असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिनही मारेकऱ्यांना प्रयागराज येथे आणून घटना घडवून आणण्यामागे या व्यक्तीचा हात होता. प्रयागराज पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे स्कॅनिंग सुरू केले आहे. अतिक अहमद आणि अश्रफ यांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी प्रश्नांची लांबलचक यादी तयार केली आहे. पोलीस तिन्ही आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी करणार आहेत. इतकेच नाही तर या मारेकऱ्यांबाबतचा संपूर्ण सीनही रिक्रिएट करण्यात येणार आहे.
१५ एप्रिल रोजी पोलीस कोठडीत अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी सनी सिंग, अरुण मौर्य आणि लवलेश तिवारी या तीन आरोपींना घटनास्थळावरून अटक केली. बुधवारी त्यांना सीजीएम न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने फक्त ४ दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. याप्रकरणी शहागंज एसओ अश्विनी कुमार सिंग यांना निलंबित करण्यात आले आहे. एसआयटीने काल एसओसह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती, त्यानंतर एसआयटीच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.