उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची १५ एप्रिलच्या रात्री पोलीस आणि माध्यमांच्यासमोर हत्या करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर गोळीबार का केला नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे. तर, पोलिसांनी गोळीबार का केला नाही? यामागील कारण जाणून घ्या...
दरम्यान, माध्यम प्रतिनिधी म्हणून आलेल्या तीन जणांनी अतीक अहमद आणि अशरफ अहमद याच्यावर अचानक गोळीबार केला. यामधील एकाने पहिली गोळी अतीकच्या उजव्या कानाजवळ झाडली तर दुसऱ्याने अशरफवर झाडली. केवळ २२ सेकंदात गोळीबार केला आणि अतीक आणि अशरफची हत्या केली. या दोघांची हत्या झाली, त्यावेळी पोलिस या दोघांचे प्रयागराजमधील कॉल्विन हॉस्पिटलमधून रुटीन हेल्थ चेक अप करून घेऊन येत होते.
ज्यावेळी गोळीबार प्रकरणी पोलिसांना विचारण्यात आले की, अतीक आणि अशरफ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार का केला नाही? त्यावर एका पोलिसांना सांगितले की, पोलिसांना रिएक्ट करण्यासाठी वेळच मिळाला नाही. ज्यावेळी लक्षात आले, अचानक काय झाले, तोपर्यंत गोळीबार थांबला होता. दरम्यान, गोळीबार झाल्यानंतर लगेच पोलिसांनी तिघांना अटक केली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सर्वकाही इतक्या लवकर घडले की पोलिसांना वेळ मिळू शकला नाही. पोलिसांना काय करायचे, त्याबाबत निर्णय घेऊ शकले नाहीत, असे उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी एके जैन यांनी सांगितले. त्याचवेळी आणखी एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांवर गोळीबार केला असता, तर हत्येमागील कारस्थान कळले नसते. पोलिसांकडे दुसरा मार्ग नव्हता.