उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलीस संरक्षणात आणि कॅमेऱ्यासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या संपूर्ण देश भरात चर्चेचा विषय बनले आहे. या हत्याकांडानंतर, विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. यातच, या संपूर्ण घटनेवर लोकांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी एका न्यूज चॅनलने सर्व्हे केला आहे.
एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, सी व्होटरने या सर्वेक्षणात, पोलीस कस्टडीमध्ये अतिक-अश्रफच्या झालेल्या हत्येवर आपले काय मत आहे? असा प्रश्न उत्तर प्रदेशातील जनतेला केला, यावर लोकांनी अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. तब्बल 51 टक्के लोकांनी, तो माफिया होता, त्यामुळे काही फरक पडत नाही, असे उत्तर दिले आहे. तसेच, 24 टक्के लोकांनी हा राजकीय कट असल्याचे म्हटले आहे. 14 टक्के लोकांनी पोलिसांचे अपयश असल्याचे म्हटले आहे. तर 11 टक्के लोकांनी माहीत नाही असे उत्तर दिले आहे.
एन्काउंटरवर लोकांचं मत काय? -सर्वेक्षणादरम्यान लोकांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता की, उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या एन्काउंटरबद्दल आपले मत काय? यावर तब्बल 50 टक्के लोकांनी हे योग्य आणि नैतिक असल्याचे म्हटले आहे. तर 28 टक्के लोकांनी हे योग्य आहे पण नैतिक नाही असे उत्तर दिले. तसेच, 13 टक्के लोकांनी हे अयोग्य आणि अैतिक असल्याचे म्हटले आहे आणि 9 टक्के लोकांनी माहीत नसल्याचे म्हटले आहे.
भाजपला फायदा की तोटो? -यावेळी लोकांना, अतिकची हत्या आणि असदच्या एन्काऊंटरचा भाजपला फायदा होणार की नुकसान? असा प्रश्नही करण्यात आला होता. यावर 47 टक्के लोकांनी भाजपला फायदा होईल असे सांगितले. 26 टक्के लोकांचा काहीही परिणाम होणार नाही, असे सांगितल. 17 टक्के लोकांनी भाजपला नुकसान होईल असे सांगितले, तर 10 टक्के लोकांनी माहित नाही, अस उत्तर दिले. या सर्व्हेमध्ये 1700 लोकांची मते जाणून घेण्याच आली. तसेच सर्वेतील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते 5 टक्के आहे.