नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी सोमवारी अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवर अनेक प्रश्न उपस्थित केले. आपत्कालीन परिस्थिती नसताना पोलिसांनी त्यांना रात्री १० वाजता वैद्यकीय तपासणीसाठी का नेले व पत्रकारांना त्यांच्याशी कसे बोलू दिले, असा सवाल त्यांनी केला.
अतिकच्या कासारी-मसारी वस्तीत शुकशुकाटप्रयागराज : प्रयागराजमध्ये हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झालेला माफिया अतिक अहमदची वस्ती कासारी-मसारी आणि त्याचा बालेकिल्ला असलेल्या शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात शुकशुकाट पसरला असून, चौकाचाैकांत पोलिसांचा खडा पहारा दिसून येत आहे. रज्जुरूपपूर, कारली आणि खुलदाबादमध्ये मोजकीच दुकाने उघडली. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील चार-पाच मुस्लीमबहुल भागातील चौकाचौकांत कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. संवेदनशील परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. संपूर्ण शहरात अजूनही इंटरनेट सेवा पूर्ववत झालेली नाही. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांचा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे न्यायालयाला सांगून पोलिसांवर कारवाईची मागणी आपण करणार आहोत, असे अतिकचे वकील मनीष खन्ना यांनी सांगितले.
यूपीत ‘जंगलराज’ आहे : ललन सिंह पाटणा : प्रयागराजमध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या झाल्याच्या घटनेवर जनता दल-संयुक्तचे अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी सोमवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात जंगलराज आहे. बिहारमध्ये जंगलराज असल्याचा गळा काढणाऱ्या भाजपवाल्यांना उत्तर प्रदेशचे पोलिस कोठडीतील आरोपींना बिनधास्त मारू देत आहेत हे मात्र दिसत नाही.
एका ट्वीटमध्ये सिब्बल म्हणाले, ‘अतिक आणि अश्रफ (संपविण्याची कला). प्रश्न :n वैद्यकीय तपासणी रात्री १० वा.?n वैद्यकीय आणीबाणी नाहीn बळी पायी का नेण्यात आलेn माध्यमांसाठी खुले?n घटनास्थळी मारेकरी एकमेकांना अनोळखी होते का?n ७ लाखांवरील शस्त्रेn शूट करण्यासाठी चांगले प्रशिक्षित!n तिघेही शरण आले.
अतिक, अशरफ हत्येच्या तपासासाठी एसआयटीउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील माफिया आणि माजी खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफच्या हत्येचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली.मारेकऱ्यांना प्रयागराजहून प्रतापगड तुरुंगात हलविलेn अतिक व त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना सोमवारी प्रयागराज मध्यवर्ती कारागृहातून प्रतापगड जिल्हा कारागृहात हलवले आहे. n हमीरपूर येथील सनी (२३), बांदा येथील लवलेश तिवारी (२२) आणि कासगंज येथील अरुण कुमार मौर्य (१८) यांना प्रशासकीय कारणास्तव मध्यवर्ती कारागृह, प्रयागराज येथून जिल्हा कारागृह प्रतापगड येथे हलविण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिकवर हल्ल्यासाठी असा ठरला प्लॅन...कासगंजचा अरुण मौर्य, बांदाचा लवलेश तिवारी आणि हमीरपूरचा सनी सिंग हे तिघेही १३ एप्रिल २०२३ रोजी प्रयागराजला पोहोचले. इथल्या एका लॉजमध्ये त्यांनी रूम बुक केली. तिघांचेही उद्दिष्ट एकच होते. काहीतरी मोठे करून गुन्हेगारी जगतात नाव कमवायचे. या तिघांनी आधीच हत्येची योजना आखली होती, फक्त योग्य क्षणाची ते वाट पाहत होते. अतिकच्या जवळ जाण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे पत्रकार बनणे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तिघांनी डमी कॅमेरे व बनावट माईक आयडीची व्यवस्था केली. यानंतर शनिवारी दिवसभर तिघांनीही पत्रकारांवर बारीक लक्ष ठेवले.