शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

“सबका हिसाब होगा...”; अतिक अहमदचं Whatsapp Chat आलं समोर, अनेकांना पाठवले होते धमकीचे मेसेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 3:14 PM

Atiq Ahmed: गुजरातमधील साबरमती जेलमध्ये असताना अतिकने एका बिल्डरला धमकीचा मेसेज पाठवल्याचे समोर आले आहे.

Atiq Ahmed: प्रयागराजमध्ये माफिया, राजकारणी अतिक अहमद याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांच्या कोठडीत असताना त्याची संरक्षण देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी गेल्या ४० वर्षांपासून असलेली दहशत संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. यातच आता अतिक अहमदचे व्हॉट्स अ‍ॅप चॅट समोर आले असून, कारागृहात असताना अतिक अहमदने अनेकांना धमकीचे मेसेज पाठवल्याचे समोर आले आहे. 

शनिवारी रात्री अतिक अहमदची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर आता अतिकचे व्हॉट्स अ‍ॅप चॅट समोर आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तुरुंगात असताना अतिकने अनेकांना धमकीचे मेसेज पाठवले असून, सर्वांचा हिशोब केला जाईल, असे म्हटल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये लखनऊ येथील एका बिल्डरचा समावेश आहे. यामुळे तुरुंगात राहूनही अतिक अहमद धमकीचे मेसेज पाठवणे, वसूली करणे अशी कामे बिनदिक्कत करत होता, असा खुलासा या चॅटमधून होताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अतिक अहमद आणि बिल्डरमधील चॅट ०७ जानेवारीचे आहे. 

गुजरातच्या साबरमती कारागृहातून लखनऊच्या बिल्डरला धमकीचा मेसेज

अतिक अहमदने गुजरातमधील साबरमती कारागृहात असताना लखनऊच्या बिल्डरला धमकीचा मेसेज पाठवल्याचे समोर आले आहे. आमच्याकडून अनेकांनी फायदा उठवला. मात्र, सर्वाधिक फायदा तुमचा झाला. तरीही पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या संरक्षणात काम केले जात आहे. तुम्हाला शेवटचे समजावले जात आहे. लवकरच ही परिस्थिती बदलेल. माझा मुलगा ना डॉक्टर होणार, ना वकील. फक्त सगळ्याचा हिशोब चुकता होणार आहे, अशी धमकी अतिक अहमदने कारागृहातून दिल्याचे चॅटमधून दिल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, ही धमकी देण्याच्या एक दिवस आधीच अतिकच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात एक गुप्त पत्र दिले होते. यामध्ये आपल्या जीवाला धोका आहे. माझी हत्या होण्याची दाट शक्यता आहे. कारागृरातील अधिकाऱ्यांनी तशी धमकी दिल्याचे अतिक अहमदने आपल्या पत्रात म्हटले होते. तत्पूर्वी, अतिक आणि अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा अदसचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. तीन दिवसातच अतिकचे कुटुंबच नेस्तनाबूत झाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसjailतुरुंग