दोन दिवसापूर्वी गँगस्टर अतिक अहमदची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. आता पत्नी आज सेरेंडर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराज येथील निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
४ मुले आणि पत्नीसाठी किती संपत्ती सोडून गेला अतीक अहमद?; आकडे पाहून डोळे फिरतील
अतिक अहमद आणि अशरफ यांची पोलिसांच्या संरक्षणात हत्या करण्यात आली. पत्नी शाइस्ता परवीन आपला मुलगा, पती आणि अशरफ यांचा शेवटचा चेहरा बघायलाही आल्या नाहीत. शाइस्ता परवीन या आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रयागराज जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. उमेश पाल हत्याकांडात शाइस्ता परवीनचेही नाव होते तेव्हापासून त्याही फरार आहेत.
शाइस्ता यांच्या विरोधात ५० हजार रुपयांचे बक्षिस घोषित करण्यात आले आहे. यूपी पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या शहरात त्याचा शोध घेत आहेत, मात्र अजुनही पत्ता लागलेला नाही. पती अतीक अहमदचे अंतिम दर्शन घेण्यासाठीही त्यांनी उपस्थिती लावलेली नाही.आता त्या आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
यापुढे पोलिसांकडून कुटुंबाचा छळ होऊ नये, त्यामुळे शाइस्ता परवीनला आता आत्मसमर्पण करायचे आहे. शाइस्ता परवीनने उमेश पाल खून प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला होता, जो फेटाळण्यात आला होता. २००५ मध्ये बसपा आमदार राजू पाल यांची हत्या झाली होती, ज्याचा एकमेव साक्षीदार उमेश पाल होता. यावर्षी २४ फेब्रुवारी रोजी अतिक अहमदच्या टोळीने त्यांची हत्या केली होती. या हत्याकांडात अतिक अहमदचा मुलगा असद याचाही सहभाग होता.