नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाएवढाही भाव मिळत नाही. यामुळे केंद्र सरकार लवकरच कायदा आणणार असून शेतमालाची किंमत यामध्ये ठरविण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले.
तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मध्ये काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत काही वस्तूंवरील निर्यातीवरची बंदी काढण्याची महत्त्वाची घोषणा सीतारामन यांनी केली. डाळी, खाद्य तेल, तेलबिया, कांदे, बटाटे या वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी उठवणार. देशांतर्गत मागणीवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची विक्री त्यांच्या इच्छेच्या दरानुसार करण्याचे स्वातंत्र्य देणार. ई कॉमर्सच्या माध्यमातून त्यांना आपला शेतमाल विकता येईल, असे सीतारामन यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे निश्चित उत्पन्न, जोखिम विरहित शेती आणि दर्जेदार उत्पादने घेण्यासाठी कायदा बनविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक रोखली जाईल आणि शेतकऱ्यांच्या जिवनात सुधारणा होईल, असे सीतारामन यांनी सांगितले.
तसेच शेतमालावर प्रक्रिया करणारे, माल एकत्र करणारे, मोठे विक्रेते आणि निर्यातदारांकडून शेतकऱ्यांना चांगले वातावरण मिळण्यासाठी कायदेशीर संरक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठीच्या अन्य मोठ्या घोषणा एका क्लिकवर...
अन्य महत्वाच्या बातम्या...
महत्वाच्या बातम्या...
Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली
बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर
अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय