नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत महत्त्वाच्या घोषणा करताना स्थलांतरित मजूर, लहान शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गृहनिर्माण आणि मध्यम वर्गासाठीही मोठी घोषणा केली. मध्यमवर्गीयांना 'परवडणारी घरं' देणारी योजना मार्च 2021 पर्यंत राबवण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.मध्यमवर्गासाठी 6-18 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी साधी, परवडणारी घरं मिळण्यासाठी क्रेडिट लिंक सबसिडी योजना लागू करण्यात आली होती. ही योजना मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत 3.3 लाख परिवारांना याचा फायदा झाला आहे. मात्र आता ही योजना मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आल्यानं आणखी 2.5 लाख परिवारांना फायदा होईल. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळेल. गृहनिर्माण क्षेत्रातली कामं सुरू झाल्यानं लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि मध्यमवर्गाला स्वस्तात घरं मिळतील, असं सीतारामन म्हणाल्या.
Atmanirbhar Bharat Abhiyan: 'परवडणारी घरं' देणारी योजना आता मार्च 2021 पर्यंत; मध्यमवर्गीयांसाठी मोठी बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 5:29 PM