नवी दिल्ली- काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखनऊमधून अल-कायदाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना एटीएसनं ताब्यात घेतलं. आता एटीएसच्या चौकशीत या दहशतवाद्यांनी मोठा खुलासा केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या दिवशी मोठा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी सुरू होती. यासाठी दहशतवाद्यांनी 'गोश्त पकाओ दोस्त आएंगे' असा सीक्रेड कोडही ठेवला होता.
पोलिस अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आणखी काही दहशतवादी पाकिस्तानातून येणार होते. या दहशतवाद्यांनी एक विशिष्ट कोड बनवला होता, त्याद्वारे ते संभाषण करायचे. हे दहशतवादी 'गोश्त पकाओ दोस्त आएंगे' हा कोड वापरुन महत्वाची माहिती एकमेकांना द्यायचे. पण, एटीएसने या दहशतवाद्यांना पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
एटीएसने कॉल डिटेल्स तपासलेएटीएसने अटक झालेल्या दहशतवाद्यांचे कॉल डिटेल्स तपासले असता मोठा खुलासा झाला. पकडलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी मिन्हाज नावाच्या व्यक्तीने 8 आणि 9 जुलै रोजी कानपूरमध्ये सर्वाधिक कॉल केले होते. तसेच, दोनवेळा नेपाळमध्येही त्याचे फोन झाले होते. या माहितीच्या आधारे एटीएसच्या विविध पथकानं दिल्ली, मेरठ, दरदोई, बरेली, कानपूरमध्ये आपला तपासाचा वेग वाढवला आहे.