ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि.4 -
बारामुल्ला येथील बीएसएफ कॅम्पवर झालेला हल्ला हा दहशतवादी हल्लाच होता, असे बीएसएफच्या अधिका-यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद तर एक जवान जखमी झाला आहे. रविवारी बारामुल्ला येथील जानबाजपोराजवळ झालेला गोळीबार म्हणजे 'हल्ला करा आणि पसार व्हा', अशा स्वरुपाचा होता, असे बीएसएफ अधिका-यांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानबाजपोरा येथे सीमा सुरक्षा दलाच्या 40व्या बटालियनला संशयास्पद हालचाली दिसल्या.
आणखी बातम्या :
यानंतर दहशतवाद्यांनी छावणीला घेराव घालत, गोळीबार करायला सुरुवात केली. गोळीबार झाल्याचे लक्षात येताच जवळच असलेल्या लष्कराच्या 46 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनीही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. यानंतर नेमके दहशतवादी छावणीमध्ये घुसले आहेत की बाहेरुन गोळीबार करत आहेत, हे स्पष्ट होत नसल्याने जवानांकडून सर्व बाजूंनी गोळीबार केला जात होता. जवळपास 90 मिनिटे हा गोळीबार सुरू होता, मात्र यावेळी एकही दहशतवादी आढळून आला नाही, असे सूत्रांनी सांगितले. काळोखामध्ये हे दहशतवादी पसार झाल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले आहे.
Etawah (Uttar Pradesh): Shivpal Yadav pays his tributes to BSF jawan Nitin who lost his life in #BaramulaAttackpic.twitter.com/8ax17UajlG— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2016