शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
2
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काँग्रेसला सरकार येणार नसल्याची खात्री'; जाहीरनामावर मुनगंटीवार यांची टीका
4
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :राहुल गांधींना वीर सावरकरांसाठी काही बोलण्यास सांगू शकता का? अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
“बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला थेट आव्हान
7
अभिनेत्री स्नेहा चव्हाणने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
8
आता लग्नपत्रिकेवरही ‘बंटोगे तो कटोगे' नारा, PM मोदी आणि CM योगींचा फोटोही छापला
9
“...तर तो व्हिडिओ व्हायरल करु नका”; मनोज जरांगेंनी केली विनंती, पाटलांना कशाची भीती?
10
खलिस्तानी दहशतवादी अर्श दलाला कॅनडा पोलिसांच्या ताब्यात; पंजाबमध्ये टार्गेट किलिंगमध्ये होता सहभाग
11
Maharashtra Election 2024: मतविभाजनाचा फंडा 'सेम टू सेम', कुणाचा बिघडवणार 'गेम'!
12
Maharashtra Election 2024: खरगेंच्या पक्षाने महाराष्ट्राला लुटलंय; बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्ला
13
भीषण! गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मी म्हातारा झालो नाही, सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा निर्धार
15
बाप रे बाप...! हा शेअर आहे की पैसा छापायचं मशीन? 4 महिन्यांत ₹1000 चे केले ₹9 कोटी! दिला 94,16,329% परतावा
16
शेतकरी अन् महिलांवर फोकस; पाहा भाजप आणि मविआच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने
17
“पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत येत राहतील, तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ राहील”: संजय राऊत
18
“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे
19
“मोदीसाहेब भाषणे देण्यात हुशार, पण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकणार नाही”: शरद पवार
20
"उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही"; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली लोकसभेतील पराभवाची सल

भाजप कार्यालयावर बिहारमध्ये हल्ला

By admin | Published: May 18, 2017 4:19 AM

राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरासह इतर ठिकाणी प्राप्तिकर खात्याने धाडी टाकल्यानंतर राजद आणि भाजपमधील संघर्ष आता रस्त्यावर आला आहे.

पाटणा : राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरासह इतर ठिकाणी प्राप्तिकर खात्याने धाडी टाकल्यानंतर राजद आणि भाजपमधील संघर्ष आता रस्त्यावर आला आहे. राजदच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपच्या पाटण्यातील प्रदेश कार्यालयावर बुधवारी हल्ला केला. लालूंवर प्राप्तीकराच्या धाडींमुळे नाराज राजद कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आज अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी त्यांची भाजप कार्यकर्त्यांशी चकमक उडाली. दोन्ही गटांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. यात भाजपचे कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. राजद कार्यकर्त्यांनी परिसरातील अनेक वाहनांचीही तोडफोड केली. त्यांनी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० ते १०० राजद कार्यकर्ते भाजप कार्यालयावर चालून गेले. त्यांच्या हातात लाठ्याकाठ्या आणि दगड होते. त्यांनी कार्यालयावर हल्ला केला. यात भाजप कार्यालयात कार्यरत दोन जण जखमी झाले. हल्ला करणाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, ओळख पटताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, भाजप कार्यालयातील नेत्यांनी पोलिसांनी राजद कार्यकर्त्यांना मदत केल्याचा आरोप केला. राजदच्या हल्ल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केले. राजद कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अनेक भाजप कार्यकर्ते जखमी झाल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले. भाजपचे कार्यकर्ते कार्यालयात काम करीत असताना राजदच्या गुंडांनी हल्ला केला, असे भाजप नेते अरविंद कुमार यांनी सांगितले. या घटनेने बिहारमधील राजकारण पुन्हा तापले आहे. राजदने ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे म्हटले, तर भाजपने सरकार आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिला. ही घटना लाजिरवाणी आणि बिहारच्या राजकारणासाठी काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केली.