भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 04:18 AM2017-12-29T04:18:38+5:302017-12-29T04:19:04+5:30
नवी दिल्ली : भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले होत आहेत, असे सांगत भाजपा राजकीय फायद्यांसाठी खोट्याचा आधार घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
नवी दिल्ली : भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले होत आहेत, असे सांगत भाजपा राजकीय फायद्यांसाठी खोट्याचा आधार घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तर सत्य आणि त्यांचे संरक्षण याला आमचा पक्ष प्राधान्य देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या १३३ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, भलेही निवडणुका हरल्या तरी, आमचा पक्ष सत्याचे संरक्षण करेल. घटनेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन ते म्हणाले की, राज्यघटना ही आमच्या देशाचा आधार आहे. जे काँग्रेस पक्षाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्यावर हल्ले केले जात आहेत. ज्या दिवशी आम्ही राज्यघटना स्वीकारली त्या दिवशी ठरविले की, सर्व जाती, धर्म यांना समान महत्त्व दिले जावे. पण, हे सरकार आणि भाजपा भेदभाव करत समाजाची विभागणी करण्याचे काम करत आहे. आज प्रत्येक भारतीय आणि काँग्रेस पक्षाचे हे कर्तव्य आहे की, राज्यघटना आणि प्रत्येक भारतीयाच्या अधिकाराचे संरक्षण केले जावे. भाजपाकडून केल्या जात असलेल्या खोट्या प्रचारावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी खोट्याचा आधार घेतला जात आहे. आमच्या पक्षात आणि त्यांच्यात हाच फरक आहे की, आम्हाला कदचित त्रास होऊ शकतो, आम्ही काही गमवू शकतो. पण, आम्ही सत्याचे संरक्षण करू.