नवी दिल्ली - इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट हिने पुन्हा एकदा भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे. कुंभ मेळा आणि त्रिसूर पूरम सारख्या पर्वांदरम्यान भारतात लास वेगास स्टाइलमध्ये हल्ला करण्यात येईल, अशी धमकी आयएसने दिली आहे. आयएसने ऑडिओ क्लीप प्रसारित करून ही धमकी दिली आहे. आयएसने प्रसारित केलेली ऑडिओ क्लीप दहा मिनिटांची आहे, मल्याळम भाषेत असलेल्या या क्लीपमध्ये कुंभ मेळा आणि त्रिसूर पूरमसारख्या महापर्वांवेळी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. कुंभ मेळा आणि त्रिसूर पूरम या पर्वावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या दोन्ही पर्वांना होणाऱ्या गर्दीचे प्रमाण पाहिल्यास अशा गर्दीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते.आयएसने प्रसारित केलेल्या दहा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्यील आवाज पुरुषाचा असून, त्याने कुराणामधील आयतांचा उल्लेख केला आहे. तसेच त्यामध्ये भारतावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या भागात कार्यरत असलेली आयएसची संघटना दौलातुल इस्लाम हिची ही 50 वी ऑडिओ क्लीप आहे. यामध्ये लास वेगास येथील हल्ल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. लास वेगास येथील हल्ल्याची जबाबदारी आयएसने घेतली होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एका टोलेजंग इमारतीच्या ३२व्या मजल्यावरून खुल्या मैदानातील खचाखच भरलेल्या संगीत महोत्सवावर एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तब्बल ५८ हून अधिक जण ठार झाले होते. या हल्ल्याने लास वेगससारखे पर्यटकांचे हब हादरले असून, संपूर्ण अमेरिकेलाही याचा धक्का बसला होता.रात्रीच्या काळोखात हॉटेलच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून येणाºया बंदुकीच्या गोळ््यांच्या प्रकाशशलाका प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्या. त्यामुळे घटनेनंतर काही मिनिटांतच तेथे दाखल झालेल्या पोलिसांच्या विशेष ‘स्वॅट’ पथकाने सरळ मोर्चा हॉटेलकडे वळविला. ३२ व्या मजल्यावर हल्लेखोर सापडला व तेथेच त्यास ठार मारण्यात आले, असे पोलिसांनी सुरुवातीस सांगितले. मात्र नंतर त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त अमेरिकी प्रसिद्धी माध्यमांनी दिले. स्टिफन पॅडॉक असे या ६४ वर्षांच्या हल्लेखोराचे नाव होते. तो लास वेगसपासून ८० मैलावर नेवादा राज्यातील मेस्क्विट येथील रहिवासी होता.
लास वेगासमधील हल्ल्याप्रमाणे कुंभ मेळ्यावर हल्ला करू - इसिसची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 5:49 PM