पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर पाटण्यातील भर कार्यक्रमात एकाने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. बख्तियारपूरमध्ये नितीशकुमार जुन्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला.
नितीशकुमार यांचे बालपण येथे गेलेले आहे. ते स्वातंत्र्यसेनानीच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करीत असताना हल्लेखोर मागून आला व त्याने नितीशकुमार यांच्या चेहऱ्यावर वार केला. टी-शर्ट, पँट घातलेल्या हल्लेखोराला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने ताब्यात घेतले व पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबतच्या एका व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी त्याला ओढून नेत असताना दिसत आहेत.