लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सन २०२२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोन आरोपींना अटक करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर शनिवारी हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात ही घटना घडली. त्यात एनआयएचा एक अधिकारी जखमी झाला असून त्यांच्या वाहनाचीही नासधूस करण्यात आली.
बंगालच्या भूपतीनगर येथे डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाच्या दोन सूत्रधारांना शनिवारी अटक करण्यात आली. बालाई चरण मैती, मनोव्रत जाना अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक करण्यास एनआयएला संतप्त जमाव मज्जाव करत होता, पण विरोधाला न जुमानता एनआयएने कारवाई पूर्ण केली.
एनआयएनेच केला हल्ला : ममता बॅनर्जीnबॉम्बस्फोटाच्या चौकशीचे कारण देऊन एनआयएच्या पथकाने शनिवारी पहाटे काही घरांची झडती घेतली. त्यावेळी पथकाने स्थानिक रहिवाशांवर हल्ला केला.nत्यामुळे लोकांनीही प्रत्युत्तर दिले, असा असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. गंभीर घटना : राज्यपालएनआयएच्या अधिकाऱ्यांवर केलेला हल्ला ही अतिशय गंभीर घटना आहे, असे पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी म्हटले.