शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : राजधानीमध्ये गुरुवारी झालेल्या मेळाव्यात सर्व विरोधी नेत्यांनी भाजपा, मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीकास्त्र सोडले. नितीश कुमार यांनी भाजपासमवेत घरोबा केल्याने संतप्त झालेल्या शरद यादव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, फारूख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, डी. राजा या सर्वांनीच जातीयवादी, धार्मिक विद्वेष निर्माण करणाºया आणि राज्यघटनेची मोडतोडकरू पाहणाºयांचा पाडाव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्तकेली.संघावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, देशात सत्तेत येईपर्यंत या मंडळींनी राष्ट्रध्वजाला सलाम केला नाही. ते आता राज्यघटना बदलू पाहत आहेत. मोदींची सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. अशा स्थितीत संघर्षासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.>सरकारपासूनच देशाला धोका - अब्दुल्लाफारूख अब्दुल्ला यांनी अतिशय आक्रमक भाषेत मोदी व त्यांचापक्ष आणि सरकारच देशासाठी मोठा धोका असल्याचा आरोप केला. देशाला चीन किंवा पाकिस्तानपेक्षा आत बसलेल्यांकडूनच धोका आहे, असे सांगून ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी आमच्याकडे पर्याय होता की, जिना यांना निवडायचे की गांधी यांना? आम्ही गांधी यांना निवडले. आज पुन्हा एकदा आमच्यासमोर आव्हान आहे.>संघाला प्रमाणपत्राची गरज नाही - वैद्यनागपूर : संघाचे अनेक स्वयंसेवक स्वातंत्र्य लढ्यात होते. जंगल सत्याग्रहात केशव बळीराम हेडगेवारही होते. पण राहुल गांधींना संघच माहीत नाही, अशी टीका करून संघाचे प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले, संघाला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.>जदयू यादव यांच्यासोबतगुलाम नबी आझाद म्हणाले की, जदयू यादव यांच्यासोबत आहे. नितीशसोबत तर भाजप जेडीयू आहे.सर्व विरोधक हजरया संमेलनाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, डी. राजा, रामगोपाल यादव (सपा), सुखेन्दु शेखर (टीएमसी), वीर सिंह (बसपा), जयंत चौधरी (आरएलडी), तारिक अन्वर (एनसीपी) यांच्यासह बाबूलाल मरांडी, रमईराम उपस्थित होते.देशात नागरिकांची घुसमट होत आहे. राज्यघटनेची तोडमोड सुरू आहे. गप्प बसून चालणार नाही. गांधीजींच्या मार्गाने आम्हाला आंदोलन पुढे न्यायचे आहे. - शरद यादव
पंतप्रधान आणि संघावर विरोधकांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 6:27 AM