नवी दिल्ली : संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्याला शुक्रवारी १८ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विविध दलांच्या नेत्यांनी शहिदांना आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टष्ट्वीट केले आहे की, शहिदांची बहादुरी आणि साहस यांच्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत. ज्यांनी संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती दिली होती. संसद भवन परिसरात आयोजित आदरांजली सभेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मनमोहन सिंग आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य पक्षाच्या नेत्यांनी शहिदांना आदरांजली अर्पण केली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी टष्ट्वीट केले आहे की, दहशतवादी हल्ला अयशस्वी करीत बलिदान देणाऱ्या सुरक्षा दलाच्या शहिदांना आदरांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टष्ट्वीट केले आहे की, संसदेची सुरक्षा करताना बलिदान देणाºया बहादूर कर्मचाऱ्यांना आदरांजली. त्यांचे बलिदान कायम स्मरणात राहील. गृहमंत्री अमित शहा यांनी टष्ट्वीट केले आहे की, भारतीय लोकशाहीच्या मंदिराचे संरक्षण करताना शहीद झालेल्या देशाच्या वीर जवानांना नमन.