ठळक मुद्देआयसिस आणि बोको हराम इस्लामचा गैरवापर करत असल्याचे सलमान खुर्शीद यांनी नमूद केले आहे.
डेहराडून : पुस्तकातील वादग्रस्त मजकुरावरून टीकेचे लक्ष्य बनलेले काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर सोमवारी काही समाजकंटकांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी खिडक्यांची मोडतोड केली तसेच दाराला आग लावली. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आयसिस ही दहशतवादी संघटना आणि हिंदुत्व एकच आहेत, असे मी माझ्या पुस्तकात म्हटलेले नसून दोन्ही एकसारख्या आहेत, असे म्हटले आहे. आयसिस आणि बोको हराम इस्लामचा गैरवापर करत असल्याचे सलमान खुर्शीद यांनी नमूद केले आहे. (वृत्तसंस्था)