श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये गुरुवारी सकाळी भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक मेजर दर्जाचा अधिकारी व एक जवान हुतात्मा झाले. याखेरीज आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे.काश्मीर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला. यानंतर संपूर्ण परिसरात सैन्याने शोधमोहीम सुरू केली. मेजर कमलेश पांडे व शिपाई तनझीन छुतीलू अशी त्यांची नावे आहेत.दोन अतिरेकी ठार-दुसरीकडे, कुलगाम जिल्ह्यात चकमकीत भारतीय जवानांनी २ दहशतवाद्यांना ठार केले. कुलगाममधील गोपालपोरा परिसरात गुरुवारी सकाळी जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.पर्यटन व व्यापार सुरू-दरम्यान काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात व्यापार व पर्यटन आजपासून पुन्हा सुरू झाले. श्रीनगर-मुझफ्फराबाद मार्गावरील पर्यटन व व्यापार २१ जुलै रोजी बंद करण्यात आले होते.त्या मार्गाने पाकव्याप्त काश्मीरमधून येणाºया ट्रकमध्ये सुमारे ३00 कोटी रुपयांचे अमली पदार्थ आढळून आल्यामुळे हा मार्ग व्यापार व पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आज दोन्ही बाजूंच्या अधिकाºयांची चर्चा होऊ न बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. (वृत्तसंस्था)
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवानांना वीरमरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:56 AM