गुवाहाटी/बंगळुरू : कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान जनतेच्या सुरक्षेसाठी काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याचे वृत्त आहे. गुरुवारी आसाममधील बजली जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाºया दंडाधिकाºयांच्या कारवर दोन व्यक्तींनी हल्ला केला. त्यांनी केलेल्या दगडफेकीत त्यांचा कारचालक जखमी झाला, तर कर्नाटकात घरोघरी भेट देऊन कोरोनाबाबत सर्वेक्षण करणाºया ‘आशा’ सेविकांना काही लोकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली.
आसाममधील बजली जिल्ह्यात दंडाधिकारी भवानीपूर येथील बाजारपेठ बंद करून लॉकडाऊनची अंमलबजावणी करीत असताना दोन व्यक्तींची त्यांच्या कारवर दगडफेक केली. यात कारचालक जखमी झाला असून, पोलिसांनी दगडफेक करणाºया दोघांना अटक केली आहे. दगडफेकीत कारचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाने या ठिकाणी गस्त सुरू केली आहे.
आशा सेविकांना धक्काबुक्की; दमदाटी
बंगळुरू शहरातील हेगडेनगर भागात आशा सेविकांना घरोघरी भेट देऊन कोरोना विषाणूच्या संशयितांबाबत सर्वेक्षण करीत असताना स्थानिक लोकांनी घेराव घालून त्यांना धक्काबुक्की केली, तसेच त्यांना येथून निघून जा म्हणून धमकावले. त्यांचे मोबाईल, बॅग हिसकावून घेत त्यांच्याशी गैरवर्तन केले.
हल्ल्यात नऊ पोलीस जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या विविध भागांत लॉकडाऊनदरम्यान जमावाने केलेल्या हल्ल्यात नऊ पोलीस जखमी झाले. दक्षिण २४ परगणा आणि पश्चिम मिदनापोर जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना जलद प्रतिसाद पथकांवर दगडफेक करण्यात आली. बुधवारी रात्री दक्षिण परगणा जिल्ह्यातील भांगोरे भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तरुणांना जमा होण्यास मज्जाव केल्याने हल्ला करण्यात आला, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. तरुणांना घरी जाण्यास सांगितले असता त्यांनी पोलिसांना मागे ढकलत त्यांच्यावर दगडफेक केली. यावेळी घडलेल्या चकमकीत एक उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल जखमी झाले.
गय केली जाणार नाही - आरोग्यमंत्री
च्या घटनेची निंदा करीत आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र काम करीत आहेत. त्यांचा आदर करा. त्यांच्यावर हल्ला झाल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
च्मैनपुरी (उत्तर प्रदेश)- कोरोनापासून बचाव करण्यासाठी बाहेरून आलेल्यांची प्रशासनाला माहिती दिल्याने संतापलेल्या लष्करातील एका जवानाने एका महिलेची गोळ्या घालून हत्या केली. ही भयंकर घटना गुरुवारी अलीपूर गावात घडली. ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार विनय बाहेरून गावी आलेल्या लोकांची यादी तयारी करीत होता.
च्उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण यांनी कृष्णवेणी यांची भेट घेऊन विचारपूस केली. महिला व बालकल्याणमंत्री शशिकला जॉली यांनीही सरकार असला बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
च्यादीत आपले नाव टाकल्याने जवान शैलेंद्र संतापला होता. जवान शैलेंद्र आणि अन्य तिघे शस्त्रे घेऊन विनय यादवच्या घरात घुसले. त्यांनी विनय, त्याचा भाऊ दिनेशला चोप देणे सुरू केले. त्यांना वाचविण्यासाठी वहिनी संध्या आली असता जवानाने रायफलीतून गोळी झाडली. यात ती जागीच ठार झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून जवानाला अटक करण्यात आली आहे.