शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न

By admin | Published: March 03, 2016 3:49 AM

इशरत जहाँ चकमकप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्याचा निर्णय राजकीय होता व तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग, गृहमंत्री पी.चिदंबरम आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हे त्यात सामील होते

नवी दिल्ली: इशरत जहाँ चकमकप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्याचा निर्णय राजकीय होता व तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग, गृहमंत्री पी.चिदंबरम आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हे त्यात सामील होते,असा आरोप भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) मंगळवारी करण्यात आला. यासंदर्भात पक्षाने काँग्रेसकडे स्पष्टीकरणाचीही मागणी केली आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर पलटवार करताना हा पक्षाच्या बदनामीचा डाव असल्याचे म्हटले आहे.संपुआ सरकारने आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणे आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी केंद्रीय तपास संस्थेचा (सीबीआय) दुरुपयोग केला होता, असा आरोप संसदीय कामकाज मंत्री एम.वेंकय्या नायडू यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेसवलर हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेस आणि पी. चिंदम्बरम यांनी ज्या कारवाया केल्या, त्या राष्ट्रविरोधी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे याचा पूर्ण तपास होणे आणि दोषींना शिक्षा होणे गरजेचे आहे. या मुद्यावर संसदेत चर्चा आणि योग्य कारवाईची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे होते. इशरतची ओळख प्रथम लष्कर-ए-तोयबाच्या वेबसाईटवर देण्यात आली होती. नंतर डेव्हिड हेडलीनेसुद्धा आपल्या बयाणात हेच सांगितले. आता गुजरात उच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रातही याचा उल्लेख असून गुजरात पोलीस व आयबीचेही हेच म्हणणे आहे. असे असताना त्यांनी प्रतिज्ञापत्र बदलले,याकडे नायडू यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, माजी गृह सचिव जी.के. पिल्लई यांनी प्रतिज्ञापत्र बदलण्याचा निर्णय राजकीय स्तरावर घेण्यात आल्याचे सांगितले आहे. राजकीय स्तरावर याचा अर्थ तत्कालीन गृहमंत्री, पंतप्रधान व काँग्रेस अध्यक्ष असा आहे. नायडू यांनी यासंदर्भात गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव आर.व्ही.एस.मणी यांच्या वक्तव्याचा हवाला दिला. मणी यांनी त्यांना प्रचंड त्रास देण्यात आल्याचे सांगितले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)पक्षाध्यक्षांकडून चिदंबरम यांची पाठराखणइशरत प्रकरणी पी. चिदंबरम यांनी योग्य तो खुलासा केला आहे, असे नमूद करतानाच, आम्ही सत्तेत असताना आणि आताही इशरत जहाँच्या प्रश्नावरून आम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपचे नाव न घेता केला. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू संघवी म्हणाले की भाजप सातत्याने खोटा प्रचार करून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.चकमक खरी का? वृंदा करातमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या सदस्य वृंदा करात म्हणाल्या की इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाचे काम करीत होती वा नाही, हा मुद्दा वेगळा असून, सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण आहे. मात्र ती ज्या चकमकीत मारली गेली, ती चकमक खरी होती वा नाही, ही बाब उघड होणे गरजेचे आहे.